नवीन लेखन...

डोळे चांगले राखण्यासाठी ‘हे’ व्यायाम ठरतील फायदेशीर!

आपण हे सर्वच चांगल्या प्रकारे जाणतो की डोळे हे मानवाला मिळालेलं एक जबरदस्त वरदान आहे. तसेच नेहमीच आपल्याला आपल्या आजूबाजूला असलेल्या थोरामोठ्यांकडून डोळ्यांची काळजी घेण्याचा सल्लाही देण्यात येतो.

सध्या आपण जर आपल्या आजूबाजूला पाहिले तर बरेच जण आपला संपूर्ण वेळ कम्प्यूटर समोर किंवा मोबाइल पाहण्यात घालवतात. अशा लोकांना डोळ्यांच्या अनेक समस्यांचा सामना करावा लागू शकतो. हळूहळू अशा लोकांची दृष्टी कमजोर होऊ शकते. त्यामुळे आपल्या मौल्यवान डोळ्यांना निरोगी ठेवण्यासाठी आपल्या शरीराप्रमाणेच त्यांच्याही आरोग्याकडे लक्ष देणं अत्यंत महत्वाचे आहे. शरीराच्या इतर अवयवांप्रमाणेच डोळ्यांनाही व्यायामाची गरज असते. तर आता आपण जाणून घेऊयात डोळ्यांच्या अशा ६ व्यायामांबाबत जे डोळ्यांचं आरोग्य चांगलं राखण्यासाठी खूपच फायदेशीर ठरतात.
eye health diseases conditions six easy exercise for your eyes | डोळे चांगले राखण्यासाठी 'हे' व्यायाम ठरतील फायदेशीर!
– ऑफिसमध्ये काम करताना प्रत्येक ३ ते ४ तासांनंतर आपले डोळे थोड्या वेळासाठी बंद करण्याची स्वतःला जाणीवपूर्वक सवय लावा. यामुळे डोळ्यांना चांगल्या प्रकारे आराम मिळतो.
– दर तासाच्या अंतराने आपल्या डोळ्यांची बुबुळं उजव्या-डाव्या आणि वरच्या आणि खालच्या दिशेला फिरवल्यामुळे डोळ्यांचा व्यवस्थित व्यायाम होतो.
– तुमचा अंगठा दोन्ही भुवयांच्यामध्ये ठेवून दोन्ही डोळ्यांनी त्या अंगठ्याच्या दिशेने काही वेळ पाहा.
– एखाद्या भिंतीवर तुम्हाला व्यवस्थित दिसेल अशा अंतरावर एक बिंदू काढा आणि त्यावर ध्यान केंद्रित करा. असे दर काही तासांनी जास्तीत जास्त वेळा करण्याचा प्रयत्न करा.
– तुम्ही एखाद्या दिव्याच्या ज्योतीकडे एक टक बघा. यामुळे डोळ्यांचे आरोग्य राखण्यासोबतच एकाग्रता वाढविण्यासाठीही त्याचा चांगल्या प्रकारे उपयोग होऊ शकतो.
– सकाळच्या वेळी हिरव्या गवतावर अनवाणी चालणं डोळ्यांसाठी फायदेशीर ठरतं. गवतावर दव पडलेलं असताना काही वेळ अशा प्रकारे अनवाणी पायाने त्यावर चालणं आपल्या शरीराच्या दृष्टीने देखील फायदेशीर ठरतं.
Sanket
Sanket
About Sanket 72 Articles
संकेत प्रसादे हे एक प्रसिद्ध लेखक, ब्लॉगर, प्रशिक्षक, समुपदेशक आणि युटूबर आहेत. त्यांची आतापर्यंत २ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. तसेच ते नवराष्ट्र ह्या दैनिकामध्ये मानसिक आणि शारीरिक आरोग्यासंबंधी लिखाण करतात. मानसिक आणि शारीरिक स्वास्थ्याबद्दल ते आपल्या लिखाणांमधून तसेच कार्यक्रमांमधून लोकांमध्ये जनजागृती निर्माण करतात.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..