नवीन लेखन...

डीएनएचे उपयोग

डीएनएचा एक महत्त्वाचा गुण म्हणजे अगदी सूक्ष्म जंतूपासून प्रगत मानवापर्यंत सर्व सजीवांत डीएनएची संरचना व घटक सारखेच असते. म्हणजे डीएनएचा एखादा अंश (जनुक) एखाद्या जंतूमध्ये एका प्रथिनाची निर्मिती करण्यास कारणीभूत असेल तर ते जनुक जर आपण दुसऱ्या वनस्पतीमध्ये संकरित करू शकलो तर त्याच प्रथिनाची निर्मिती आपण वनस्पतीत करू शकू.

प्रत्येक सजीव पेशी एखाद्या रसायनाच्या कारखान्याप्रमाणे काम करत असते. पेशीच्या जीवनकालात प्रथिने, विकरे, हार्मोन्स अशा अनेक जैविक रसायनांची निर्मिती होत असते. आपल्या शरीरातील अन्नाचे चयापचन, प्राणवायूपासून ऊर्जानिर्मिती इ. अनेक जैवरसायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या विकरांच्या निर्मितीला डीएनएच जबाबदार असतो. डीएनएच्या या कार्याचा उपयोग करून कृषितंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आहे.

प्रत्येक सजीव पेशी रसायनाच्या एखाद्या कारखान्याप्रमाणे काम करत असते. पेशीच्या जीवनकालात प्रथिने, विकरे, हार्मोन्स अशा अनेक जैविक रसायनांची निर्मिती होत असते. आपल्या शरीरातील अन्नाचे चयापचन, प्राणवायूपासून ऊर्जानिर्मिती इ. अनेक जैवरसायनिक प्रक्रियांसाठी लागणाऱ्या विकरांच्या निर्मितीला डीएनएच जबाबदार असतो. डीएनएच्या या कार्याचा उपयोग करून कृषितंत्रज्ञान आणि वैद्यकीय तंत्रज्ञानाचा पाया रचला गेला आहे.

गाजर, पपईसारख्या रंगीत फळात बीटा कॅरोटीन नावाचे रसायन असते, ज्यापासून आपल्याला ‘ए’ जीवनसत्त्व मिळते. कृषिवैज्ञानिकांनी बीटा कॅरोटीनच्या निर्मितीला कारणीभूत असणाऱ्या जनुकाचे तांदळात संकर करून पिवळ्या रंगाचा ‘गोल्डन राईस’ बनविला आहे. ज्यामुळे आपल्याला त्या तांदळातून ‘ए’ .जीवनसत्त्व मिळते. वर्तमानपत्रात बी. टी.होऊ शकतो. कापूस व बी. टी. वांग्यावर झालेला ऊहापोह आठवत असेल. बॅसिलस जातीचा एक सूक्ष्म जीव असे एक रसायन बनवतो की ज्याचा उपयोग कीटकनाशक म्हणून बॅसिलसमधील या रसायनाच्या जडणघडणीला कारणीभूत असणाऱ्या जनुकाचा संकर कापूस अथवा वांग्याच्या जनुकाशी करण्यात आला आहे. त्यामुळे अशा कापसाची बोंडे अथवा वांगी किडीच्या प्रादुर्भावापासून सुरक्षित असतात. असेच तंत्रज्ञान वापरून अधिक प्रथिने असणारी किंवा अधिक उपज देणारी तसेच अधिक स्निग्धांश असलेल्या तेलबियांची संकरित वाणे तयार करता येतात.

असेच तंत्रज्ञान वैद्यकीय क्षेत्रात पण वापरले जाते. मधुमेहावर वापरात असणारे इन्सुलिन डुकरापासून मिळविले जाते. पण आता मानवात इन्सुलिन बनविणारे जनुक ई. कोलाय या सूक्ष्मजीवात संकरित करून त्यापासून इन्सुलिनची निर्मिती करता येते. हे इन्सुलिन अधिक प्रमाणात मिळविणे शक्य असल्यामुळे ते कमी दरात उपलब्ध होऊ ला शकेल.

-डॉ. मृणाल पेडणेकर
मराठी विज्ञान परिषद

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..