नवीन लेखन...

उषःकाल होता होता काळरात्र आली

मे-जून २००८ मधला हा प्रसंग. झांझीबार बेटावरचा वीजप्रवाह कोणतीही पूर्वसूचना नसतांना एके दिवशी अचानक बंद पडला.

कारण होते, या बेटाला वीज पुरवठा करणारी टांझानियाहून येणारी विद्युतवाहक तार विद्युत्मंडलासकट एकवीस मे २००८ रोजी कोसळून पडली. देशभर काळोख पसरला. एकवीस मे ला गेलेली वीज जवळ जवळ एक महिन्याने म्हणजे १९ जूनला परत आली. समुद्र-तळावरची जुनी विद्युतवाहिनी तार कमकुवत झाल्यामुळे असे घडले ही या अपघाताची कारणमीमांसा होती. पण पुनः सर्व कसे मार्गावर आणता येईल याचा खात्रीलायक खुलासा होईल याची प्रतिक्षा होती. पण हेच संकट १० डिसेंबर २००९ ला परत हजर झाले.

ते टिकले मार्च २०१० पर्यंत म्हणजे तब्बल तीन महिन्यांच्या कालावधीपर्यंत. कारण तेच होते. म्हणजे, समुद्रतळाची तार परत कुचकामी झाल्याचे.

सार्वजनिक व्यवस्था सुकर आणि सुरक्षित करण्याकडे सर्वच देशांचे तज्ज्ञ कार्यरत असतात. सुधारणांसाठी महागडी यंत्रे किवा बलशाली संगणक आणल्यावर काम फत्ते झाले असे मुळीच नाही. मूळात उत्तरदायित्व स्वच्छ व पारदर्शक असल्यावर जनतेला अकस्मात संकटाला सारखे सामोरेही जावे लागत नाही.

– अरुण मोकाशी

परिवहन तज्ज्ञ अरुण मोकाशी यांच्या झांझिबार डायरी या इ-पुस्तकातील लेखाचा हा अंश.

हा संपूर्ण लेख तसेच त्यांचे या पुस्तकातील सर्व २५ लेख वाचण्यासाठी हे पुस्तक खरेदी करा. 

हे इ-पुस्तक खरेदी करण्यासाठी खालील लिंकवर क्लिक करा…
https://marathibooks.com/books/zanzibar-diary/

किंमत : रु.२००/
सवलत किंमत : रु.५०/-

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..