मल्हार घराण्याचे सरोद वादक अली अकबर खान यांचा जन्म १४ एप्रिल १९२२ रोजी आत्ता बंगला देश मध्ये असलेल्या शिबपूर नावाच्या खेड्यात झाला. त्यांच्या वडीलांनी म्हणजे अलाउदीन खान यांनी अनेक रागात शास्त्रीय संगीतातातील रचना बांधल्या त्याप्रमाणे काही चित्रपटांना पार्श्वसंगीत दिले. त्यांनी कोलकत्ता येथे १९६७ साली संगीताचे अली अकबर कॉलेज काढले पुढे अमेरिकेतील सॅन रफेल येथे नेण्यात आले , त्याच्या शाखा बसेल आणि स्विझर्लंड येथेही आहेत करंट अली अकबर खान आधीच अमेरिकेत स्थायिक झालेले होते. ते १९५५ साली अमेरिकेत स्थाईक झालेले होते ते सुप्रसिद्ध व्हायोलीन वादक यहुदी मेहुनीन यांच्या सांगण्यावरून.
उस्तादजींना त्यांच्या वडीलांकडून अनेक वाद्याचे प्रशिक्षण मिळाले पण ते सरोदकडे जास्त आकर्षित झाले .त्यांचे वडील अलाउदिन खान कडक शिस्तीचे होते. पहाटेच त्यांचे संगीताचे धडे सुरु होत ते अठरा तास चालत. उस्तादजी तबला आणि पखवाज त्यांच्या काकांकडून आफताबुददीन खान यांच्याकडून शिकले. सुप्रसिद्ध सरोद वादक तामीर बरन आणि सुप्रसिद्ध बासरीवादक पन्नालाल घोष यांच्याकडेही शिकले त्यावेळी ते शिबपूर येथे येत असत. अन्नपूर्णा देवी कडूनही ते शास्त्रीय संगीत शिकले , पंडित रवीशंकर यांच्याबरोबरही त्यांनी कार्यक्रम केले पुढे १९४१ साली अन्नपूर्णादेवी आणि पंडित रवीशंकर यांनी विवाह केला. उस्तादजींनी जगभर कार्यक्रम केले त्यांचे विद्यार्थीही जगभर आहेत.
उस्तादजी म्हणतात ,’ तुम्ही जेव्हा १० वर्षे सर्व करता तेव्हा स्वतःला प्रसन्न करता , २० वर्षे सराव करता तेव्हा तुम्ही कार्यक्रम करून प्रेक्षकांना प्रसन्न करता. ३० वर्षे सरावानंतर तुम्ही तुमच्या गुरूला प्रसन्न करू शकता परंतु तुम्ही खूप खूप वर्षे सराव कराल तेव्हा खरे कलाकार बनता आणि मग तुम्ही ईश्वरालाही प्रसन्न करू शकता. ‘ ह्याचा खरा बोध आजकालच्या कलाकारांनी घेतला पाहिजे.
उस्तादजींना बघण्याचा आणि आईकण्याचा योग्य फार वर्षांपूर्वी मुंबईत मला आला होता. त्यांना भारत सरकारने पदमभूषण दिले आणि त्यांना ग्रॅमी अवॉर्ड देखील मिळाले होते. त्याप्रमाणे परदेशी पुरस्कारही मिळाले होते. अशा महान वादकाचे अमेरिकेत १८ जून २००९ मध्ये निधन झाले.
— सतीश चाफेकर.
Leave a Reply