नवीन लेखन...

बिस्मिलाह खासाहेब

सनईचे सूर संपूर्ण भारतवर्षात नव्हे तर संपूर्ण जगभर नेणाऱ्या बिसमिल्लाह खासाहेब यांचा जन्म २१ मार्च १९१६ रोजी बिहारमधील डूमराव येथील बक्सर जिल्ह्यात झाला. त्यांच्या वडलांचे नाव होते बक्शखान तर आईचे नाव होते मिठान .

त्यांचे वडील राजदरबारी सनईवादक होते. वयाच्या सहाव्या वर्षी ते वाराणसीमध्ये आले. त्यानंतर तेथे वयाच्या सहाव्या वर्षापासून त्यानी आपले काका ‘ अली बक्श ‘ यांच्याकडे सुरु केले. अत्यंत कठोर परिश्रम ते करत असत याचा आपण सामान्य माणूस विचारही करू शकणार नाही. सलग ९ वर्षे त्यांनी अठरा-अठरा तास रियाझ केलेला आहे.

त्यांच्या जवळच्या काही नातेवाईकानी आणि ठाण्यातील त्यांचे शिष्य पं. शैलेश भागवत यांनी यांच्या खूप आठवणी सांगितल्या . ते म्हणाले खांसाहेब कधीही रिकामे बसत नसत सतत त्यांच्या सनईबरोबर असत. वेळ मिळाला की सतत रियाझ चालूच असे , अगदी आयुष्याच्या शेवटपर्यंत. सनई त्यांचा श्वास होती आणि त्या त्यांच्या श्वासाने संपूर्ण आजूबाजूचा परिसर मंत्रमुग्ध होत असे. दूरदर्शनची सुरवातच खानसाहेबांच्या सनईने झाली होती. मला त्यांना खूप वेळा भेटण्याचा, आईकण्याची संधी मिळाली होती. म्हणून मी स्वतःला खूप भाग्यवान समजतो. आयुष्यात जर सतत कठोर परिश्रम केले तर माणूस काय करू शकतो त्याचे खांसाहेब हे उत्तम उदाहरण आहे. तसे पाहिले तर त्यांचे पुस्तकी शिक्षण जवळजवळ नाहीच म्हणावे लागेल. तरी पण त्यानी भारतीय संगीताचा इतिहास जगाच्या नकाशावर कोरून आपल्या देशाचे नाव उज्व्वल केले. त्यांना मला अनेक वेळा भेटता आले , त्यांचे अनेक मी कार्यक्रम बघीतले होते. बिस्मिल्लाह साहेबाना भारत
सरकारने २००१ साली भारताचा सर्व्वोच सन्मान ‘ भारतरत्न ‘ दिला. त्यांना त्याआधी त्यांना पद्मश्री , पद्मविभूषण ह्या सारखे अनके पुरस्कार मिळाले होते.

बिस्मिल्लाह खान साहेब आणि सनई यांचे नाते अतूट होते. आजही जगात कुठेही सनई किवा ‘शेहनाई ‘ म्हटले की त्यांचेच नाव जगाच्या तोडावर येते.

भारताच्या या थोर सुपुत्राचे निधन २१ ऑगस्ट 2006 साली वाराणसी येथे झाले.

— सतीश चाफेकर.

Avatar
About सतिश चाफेकर 448 Articles
सतिश चाफेकर हे एक बहुआयामी व्यक्तिमत्त्व आहे. जगभरातील ३०००० पेक्षा जास्त व्यक्तींचा स्वाक्षरीसंग्रह त्यांच्याकडे आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..