अन्न शिजवताना जे भांडे वापरले जाते, त्या भांड्याचे गुण अन्नामधे उतरतात.
पूर्वीची भांडी तांब्यापितळीची होती. त्याला कल्हई लावली जाई. कल्हई म्हणजे झिंक / जस्त. या कल्हई केलेल्या भांड्यात जेव्हा फोडणी दिली जाई किंवा डाळ शिजवली जाई, तेव्हा शिजत असलेल्या अन्नात आपोआपच जस्ताचा सूक्ष्म अंश जात होता. शिवाय तांब्यापितळीचे औषधी गुणपण मिळत होते.
आजचे संशोधन असे सांगते, शरीरातील झिंक कमी होते, म्हणून मधुमेह, ह्रदयविकार होतात.
काय जमाना आलाय, जी भांडी औषधी गुणांनी युक्त होती, ती मोडीत देऊन टाकली आणि बीकोझिंकच्या गोळ्या खात बसलो. याला म्हणायचा विकास.
अॅल्युमिनियम, हिंडालीयम हे धातु शरीराला हानीकर आहेत, हे अर्वाच्च विज्ञान सांगते आहे, तरीदेखील शाळेतील पोषण आहार किंवा मंगल कार्यालयातील आहार याच भांड्यात केला जातोय. (सोयीस्कर दुर्लक्ष)
पूर्वी तुरूंगातील कैद्यांना ( ते लवकर आजारी पडावेत, म्हणून ) हिंडालीयमच्या ताटात जेवण वाढायचे.
आम्ही आमच्या घरालाच आता तुरुंग बनवलाय. तवा, चहाची किटली, दुधाची पातेली, कढई, अंडी उकडण्याचे पातेली हमखास अॅल्युमिनियम किंवा हिंडालीयमची असतात !
सर्वात चांगले भांडे मातीचे ! आपले शरीर ज्या अठरा मुलद्रव्यांनी बनले आहे, तीच अठरा मुलद्रव्ये मातीत आहेत. मातीच्या भांड्यात आपण फोडणीपण देऊ शकतो, दूध तापवू शकतो, दही लावू शकतो, पेजसुद्धा शिजवू शकतो. गॅसवरपण ठेवू शकतो.
मातीची भांडी वापरण्याचा आणखीही एक फायदा म्हणजे घरातला राग भांड्यावर काढला जावू शकत नाही.
वेळ आली आहे,
बदल करण्याची…
वेळ आली आहे,
बदल स्विकारण्याची…
वेळ आली आहे,
जुनं ते सोनं म्हणण्याची….
— डॉ. गौरी पाटील
निसर्गोपचार तज्ज्ञ
मातीची भांडी कुठे मिळतील व किंमत किती
खूप छान माहिती आहे. परंतु भाजी करण्यासाठी स्टील ची भांडी कुणीच वापरत नाही.
CHAN. KASHI VAPRAVI HE SUDDHA SANGAVE PLEASE.