संजीवकुमारचा जन्म ९ जुलै १९३८ ला सूरत येथे झाला. त्यांचे वडील जेठालाल हे कृष्णाचे परमभक्त होते. म्हणून त्यांनी संजीवकुमारचे नाव हरिहर ठेवले.पुढे ते हरिभाई झाले. पुढे त्यांचे वडील व्यवसायासाठी मुंबईला आले.ते जरीचा व्यवसाय करू लागले म्हणून त्यांना जरीवाला संबोधले जाऊ लागले. सगळे व्यवस्थित चालू असताना १९४९ मध्ये त्यांच्या वडिलांचे निधन झाले. त्यावेळी ते फक्त ४७ वर्षांचे होते. त्यांच्या नातलगानी सगळा व्यवसाय हडपला. त्यांच्या कुटुंबाला सांताक्रूझची जागा सोडून भुलेश्वर येथे एका लहान जागेत यावे लागले. हरिभाईने शाळा सोडण्याचा निर्णय घेतला. पण आईने त्याला विरोध केला.तो शाळेत जाऊ लागला. पण त्याला नाटकात जास्त रस होता,क्रिकेट मध्ये सुद्धा रस होता. त्याला तेथेच एक जिवलग दोस्त मिळाला ते दोघे मिळून शाळेच्या नाटकात काम करू लागले.दोघानी बैजू बावरा पाहिला तेव्हापासून दोघांनाही चित्रपटांचे वेड लागले. त्यांचा तो दोस्त होता आघाडीचा अभिनेता सत्येन कप्पू. संजीवकुमारचे चित्रपटाचे वेड पाहून आईने हंसी या मुलीबरोबर त्याचा साखरपुडा ठरवला पण संजीवकुमारने लग्न केले नाही.
संजीवकुमारने अभिनयासाठी ईपटा या संस्थेत दाखला घेतला.त्यावेळी ए के हंगल यांनी त्याला मजबा या नाटकात ६० वर्षाच्या म्हाताऱ्याची भूमिका दिली त्यावेळी त्याचे वय फक्त १९ होते. हम हिंदुस्तानी हा संजीवकुमारचा पहीला चित्रपट,दूसरा चित्रपट निशान पण तो स्टंटपट होता नंतर त्याला सरस्वती चंद्र चित्रपट मिळाला,थोडे शूटिंगही झाले, पण अचानक काढले कारण निर्मात्याला वाटले की स्टंटपटचा हीरो नको. त्याच वेळेस एल. व्ही प्रसाद गुरुदत्तला घेऊन खीलोना काढणार होते पण गुरूदत्तचे अचानक निधन झाले.पण नंतर काही वर्षानी संजीवकुमारचे नाव फायनल झाले कारण संजीवकुमारने “मारे जाऊ पेले पार “ ह्या गुजराथी चित्रपटात काम केले होते व त्याला अवॉर्ड मिळाले होते. आणि ती भूमिका खीलोना सारखी होती. त्याचे पुढे हेमा मालिनिवर प्रेम बसले. हेमा मालिनी कडे त्याची आई लग्नाचा प्रस्ताव घेऊन गेली पण लग्नानंतर सिनेमात काम करायचे नाही म्हणून तिने नाकारले त्यावेळी हेमा मालिनी टॉपची हिरोईन होती.
संजीवकुमारने प्रत्येक रोल आव्हान म्हणून स्वीकारला. त्याची लांबी बघितली नाही कारण त्याला आपल्या अभिनयाच्या ताकदिवर पूर्ण विश्वास होता, त्याला दस्तक चित्रपट मिळाला.त्या चित्रपटाला अवॉर्ड मिळाले ( ह्या चित्रपटातील “ हम हे मताए कुचा बाजार की तरहा “ या गाण्यात संजीवकुमारची अगतिकता,चीड द्वेष पाहिली की संजीवकुमार काय चीज आहे हे लक्षात येते फक्त पाच ते दहा सेकंद त्याच्यावर शूट आहे ) कोशिश मध्ये तर एकही वाक्य नव्हते ,जे बोलायचे होते ते डोळे व देहबोलीतून.नया दिन नई रात ह्या चित्रपटासाठी आधी दिलीपकुमारला विचारले होते पण त्याने सांगितले की “ माझ्या पेक्षा संजीवकुमार काम जास्त चांगले करेल.” उलझन चित्रपटांच्यावेळी सुलक्षणा पंडित त्याच्या प्रेमात पडली,पण त्याने नकार दिला. त्याच्या घरात कोणताही पुरुष पन्नाशी पार करत नव्हता.
संजीवकुमार बेसुमार दारू व सिगारेटचे सेवन करीत असे . त्याचा परिणाम व्हायचा तो झाला. १९७५ मध्ये त्याला हृदयविकाराचा झटका आला. तरी त्याने व्यसने सोडली नाहीत. डॉक्टरनी लांबचा प्रवास टाळायला सांगितले ६ ऑक्टोबर १९७६ एफ फेस्टिवल केनडा येथे गेला पण तिथेही माइल्ड अटॅक आला. त्यानंतर बायपास करण्यात आली. त्यामुळे शूटिंगच्या वेळी हालचाली मंदावल्या. ०५ नोव्हेंबर १९८५ ला त्याने डबिंग केले. ६ नोव्हेंबरला एका चित्रपटाच्या चर्चेसाठी सचिन येणार होता. सकाळीच संजीवकुमारला उलटी झाली. सचिन आला. संजीवकुमारने सांगितले की “मी आंघोळ करून येतो”. पण सोफ्यापर्यंत गेला आणि कोसळला. आणि ह्या जगाला अलविदा केले.
संजीवकुमारला मिळालेली अवॉर्ड-नॅशनल अवॉर्ड दस्तक,कोशिश,फिल्म फेअर अवॉर्ड -१३ त्यांनी जवळ जवळ १७० चित्रपटात काम केले.
संजीवकुमार चे काही गाजलेले चित्रपट
खिलोना
कोशिश
मंचली
नया दिन नई रात
शोले
मौसम
आनधि
त्रिशूल
सिता और गीता
— रवींद्र शरद वाळिंबे.
Leave a Reply