आयुष्यातल्या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुमच्याकडे आहेत का ?
‘माणसाला सोडवता येणार नाही असा कुठलाच प्रश्न त्याच्यापुढे असत नाही’ असे जॉन केनेडी म्हणून गेलेत. पण काही प्रश्न असे किरकोळ असतात की त्यांच्या असण्या नसण्यानं आपल्यात काहीही फरक पडत नाही.
हे छोटे छोटे प्रश्न आपल्याला नेहेमीच सतावत असतात.. कोणते आहेत ते प्रश्न ?
- मराठी पेपरच्या रद्दीचा भाव इंग्रजी पेपरपेक्षा कमी कां?
- उडप्याच्या हॉटेलात कांदाभजी कां मिळत नाही?
- एशियाडमधला प्यॉशिंजर साध्या एस्टीतल्या
- माणसांकडे अशा हुडुत नजरेनं कां बघतो?
- तांबडा सिग्नल पडलेला असताना आपल्या मागचा वाहनवाला ट्रॅट्रॅ हॉर्न कां वाजवत असतो?
- लहान बाळाशी बोलताना मोठी माणसं बोबडं कां बोलतात.?
- बशीत ओतून चहा प्याला तर ‘येडंच आहे’ अशा नजरेनं माणसं आपल्याकडं कां बघतात?
- ‘मीच म्हणून तुमच्याशी संसार केला’ असं प्रत्येक बाई आपल्या नवऱ्याला कां म्हणते?
- आपण हॉटेलात बसल्याबरोबर तिथल्या पोऱ्या नेमकी आपल्या बाकाखालची फरशी साफ करायला कां येतो?
- ‘तुम्ही हा प्रश्न चांगला विचारलात’ असं मुलाखत देणारा प्रत्येक माणूस प्रश्नकर्त्याला कां म्हणतो?
- हॉटेलात इडलीसांबारातली शेवग्याची शेंग चमच्यानं कशी खायची?
- ‘गॅसवर दूध ठेवलंय, जरा लक्ष द्या’ म्हणून बायकोनं सांगितल्यावर आपली नजर चुकवून दूध उतू कसं जातं?
- दोन शेजारणी ‘खूप कामं पडलीत बाई’ म्हणत दारात उभं राहून अर्धा अर्धा तास कां बोलत असतात?
- ‘अज्ञानात सुख असतं’ असं म्हणत असताना माणूस ज्ञान मिळवण्यासाठी कां धडपडतो?
Leave a Reply