आर्त घालिता साद, मनापासुनिया निसर्गराणीला,
होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव-भावनांचा ।।धृ।।
लाल होऊनि किल्ला, होता झेलित, हल्ल्या हल्ल्याला ।
राजघाटीं, शांती होती वंदित, अजोड अभंग अहिंसेला ।।
गौर जनांचा गेट इंडिया, होता करीत , मुजरा मानाचा ।
कमाल मंदिरीं विराजे, नि:शब्द शांती ध्यास चिंतनाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव-भावनांचा ।।१।।
धामीं अक्षर, लीन सारे, वंदन पावन स्वामी चरणाला ।
नयन तोषिले, फिटले पारणे, नमन मंगल शिल्पाला ।।
हृदय स्पंदले, नयनही भिजले, प्रभाव स्वामी ओडाचा ।
तारणहरी, कंठनील तो, झाला स्वामी आमुच्या हृदयाचा ।।
वेळी अशा या, होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमाल भाव-भावनांचा ।।२।।
स्वर्ण-मंदिरीं, ग्रंथ साहिबां दावी सनमार्ग जगताला ।
तळ हातीं शीर घेऊनि, जाय अवघे, तापर लढण्याला ।।
बाग नव्हे ती जालियानवाला, तो तर, नरमेध शार्दूलांचा ।
रक्त वाळले, परि ऐकू येतो, धि:कार क्रूर डायरचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव-भावनांचा ।।३।।
वाघा येथे भिडली सीमा, अपुल्या जुन्याच शत्रू सीमेला ।
सीमेवरती सीमा नव्हती, जवानांचा असीम शौर्याला ।।
त्वेषा-त्वेषाने, केला जयजयकार भारत मातेचा ।
सलाम करुनि देशप्रेम, घेतला निरोप, बॉर्डर वाघाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।४।।
नव्हता गढ चण्डी येथे, परि, मान आगळा शहराला ।
रेखिव शहरीं, भेट दिली, नीटस् पाषाण बागेला ।।
कुरुक्षेत्री, पार्थे टेकला, उपदेश अपुल्या सारथ्याचा ।
झालो नतमस्तक, मान ठेविला, शर-पंजरी भीष्माचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।५।।
मंद झाला सूर आमुचा, दिली दाद गार मसूरीला ।
शांतचित्ती, रोप चेतुनि, वंदिले, केदार-बद्रीनाथाला ।।
निलांत सुंदर तो नयनमनोहर, प्रपात केमरीचा ।
शब्दहीन त्या वातावरणीं, सृदयी नादगुंजला ब्रम्हाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।६।।
ऋषीकेशाच्या सम्यदर्शनी, मनमयूर नाचू लागला ।
राम-रामभाऊच्या झुल्यांवरुनि, वंदिले गंगा मातेला ।।
देहचि अवघा चक्षु असता, घेण्या आस्वाद निसर्गाचा ।
शमली तहान-भूक, पडला विसर देहाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।७।।
मनीं वंदिले, पुण्य भूमीला, हरिद्वाराच्या हरिपौडीला ।
थोर तपस्वी गेले होऊनि, ठेवुनि साथी गंगा मातेला ।।
टाळ-मृदुंगी कंठखअने घुमला, नाऽद गंगा स्तवनाचा ।
हृदयकोंदणी ठसुनि ाहिला, हा कल्लोळ चिदानंदाचा ।।
वेळी अशा या होतसे अविष्कार अंतरीं, सुकोमल भाव भावनांचा ।।४।।
-गुरुदास / सुरेश नाईक
१६ फेब्रुवारी २००६
मुंबई ४०००८१
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply