वाणी जयराम या दक्षिणच्या एक प्रतिभाशाली गायिका आहेत. वाणी जयराम यांचा जन्म ३० नोव्हेंबर १९४५ रोजी झाला. त्यांनी तमिळ, तेलुगू , कन्नड, मल्याळम हिंदी आणि मराठी , गाणी गायली आहेत आहेत. त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारने तीन वेळा सन्मानित केले गेले आहे. त्याचे पार्श्वगायना मध्ये खूप योगदान आहे. वयाच्या ८ व्या वर्षी त्यानी आकाशवाणी वर गायन केले. कर्नाटक और हिंदुस्तानी शैली त्या शिकल्या नाहीत तर त्यांनी विशेष अभ्यास केला. लग्नानंतर मुंबईत आल्यावर प्रथम ब्रेक मिळाला तो संगीतकार वसंत देसाई यांनी १९७१ मध्ये ‘गुड्डी’ चित्रपटासाठी ३ गाणी गाऊन घेतली तेव्हा.
वाणी जयराम यांनी गायलेल्या “बोल रे पपीहरा” या गाण्याने त्यांना एका रात्रीत प्रसिद्धी मिळाली. या गाण्याला त्यांना तानसेन सन्मान मिळाला. सन १९८० साली ‘मीरा’ या चित्रपटा साठी फ़िल्म-फ़ेयर पुरस्कार मिळाला. दाक्षिणात्य कलाकार असूनही गायिका वाणी जयराम यांचे मराठी नाटय़संगीत आणि भावगीतांमधील योगदान मोठे आहे.`संगीतकार वसंत देसाई यांना त्यांच्या आवाजातील व्याकुळता आणि पोत आवडला आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली तिची सुरुवातीची वाटचाल इथे सुरू झाली. केवळ वसंत देसाई यांनी आपल्या आवाजावर आणि सांगितिक प्रतिभेवर घेतलेल्या परिश्रमांमुळे आपली कारकीर्द यशस्वी ठरली अशा शब्दांत वाणी जयराम याही कृतज्ञता व्यक्त करतात.
‘ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी’ हे एकमेव नाटय़पद सोडले तर वाणी जयराम यांची बाकी सर्व गाणी ही भाव आणि चित्रपट गीते आहेत. ‘प्रेम पिसे भरले अंगी’ यातून ईश्वराविषयी वाटणारी उत्कटता संत नामदेवांनी आपल्या या अभंगातून साकारली आहे. ‘टाळ मृदुंग उत्तरेकडे, आम्ही गातो दक्षिणेकडे’ असे या गीतांत नामदेव म्हणून जातात. उत्तर ही भोगाची दिशा आहे तर पश्चिम ही मुक्ती देणारी दिशा आहे. आध्यात्मात रंगलेल्या या संताला साहजिकच भोगाऐवजी मुक्तीची आस लागली आहे. कोरसमध्ये या गीताची मोहिनी काही विलक्षणच आहे.
‘प्रियतम दर्शन देई, तुजविण करमत नाही ‘पाहिलं का कुणी पाहिलं का’, देवाचे घर कुणी पाहिलं का? ‘दूर जाते ही वाट रात्र अंधारी दाट, अरे कान्हा रे मला जाऊ दे घरी’ हे उच्च पट्टीत त्यांनी बांधलेले गीत वाणी जयराम पुन्हा झकास रंगवून गेल्या आहेत. ‘यशोदा’ या चित्रपटातील ‘माळते मी माळते, केसात पावसाची फुले मी माळते’ आणि ‘जिवलग माझा नाही आला’ (परिवर्तन) ही संगीतकार दत्ता डावजेकर यांची गाणी आहेत, तर संगीतकार राम कदम यांची ‘उठा उठा हो सूर्यनारायणा’ ‘माठ पाण्यात बुडाला’ आणि ‘थांब जोडीदारा’ ‘माठ पाण्यात बुडला’ हे ‘भोळी भाबडी’ चित्रपटातील गीत.‘भोळी मात्र त्यातले ‘टाळ बोले चिपळीला, नाच माझ्या संगे’ हे रामभाऊंचे गाणे अधिक लोकप्रिय झाले होते.
‘जसा पाऊस उन्हात न्हाला’ आणि ‘झाले बेजार गर्दी ही दाटली’ दोन गाणीही चांगली गाजली होती. मा.वाणी जयराम यांची ही सर्व गाणी आता ती सहसा ऐकायला मिळत नाहीत.
संजीव वेलणकर पुणे.
९४२२३०१७३३
संदर्भ. इंटरनेट. https://www.youtube.com/watch?v=SPAjRbHvobs https://www.youtube.com/watch?v=NbchuCfqBls
Leave a Reply