स्वप्नातही बघताना ज्याची भीती वाटते
ते वास्तव असते
वास्तव आणि स्वप्न
एकाच नाण्याच्या दोन बाजू
एक चमकते दुसरे भासते
वास्तव आणि स्वप्न
दोन विरुद्ध गोष्टी
एक खरी दुसरं खोटी
वास्तवात जगायला हिम्मत लागते
स्वप्नातही वास्तव नकोसे वाटते
स्वप्नात मन स्वैर होते
वास्तवात मन बंदिवान होते
स्वप्नात कल्पनांचे डोंगर रचले जातात
वास्तवात ते सर्व कोसळतात
वास्तव हे वास्तव आहे पटल्यावर
स्वप्न हे स्वप्न आहे मानल्यावर
स्वप्नही कधीकधी वास्तवाशी लढायला बळ देते
वास्तवही कधीकधी स्वप्न वाटायला लागते
वास्तवातील स्वप्न आणि स्वप्नातील वास्तव
संसारातील बेरजा, वजाबाक्या, भागाकार आणि
गुणाकार करताना दोघांचे भान ठेवते !
— जगदीश पटवर्धन
Leave a Reply