वातावरण निर्मित होते, जसे जातां वागूनी ।
हर कृतिची वलये बनती, तरंगे निघूनी…१,
फिरत असती वलये , सारी अंवती भंवती ।
चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२,
जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी ।
चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी….३,
जाता दुष्ट व्यक्ती , आपल्या जवळूनी ।
चलबिचल मन होते, केवळ सानिध्यानी…..४,
याच लहरी घुसुनी शरीरि, मनी आघांत करती ।
मनामध्ये बदल करूनी, तीच वृत्ती बनविती…५,
विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे ।
कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते…६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
Leave a Reply