तुम्हाला कितीही मित्र असले तरी प्रत्येक क्षणी त्यांची सोबत असतेच असे नाही. विशेषतः तुम्ही एकटे असल्यावर आणि त्याच वेळेला एखादे अवघड काम तुम्हाला करावयाचे असेल किंवा एखादी अवघड जबाबदारी पार पाडायची असेल तर अशा वेळी तुम्हाला सोबतीची गरज नक्कीच भासते. अशा स्थितीत तुम्ही कोणालाही ‘सोबती’ करू शकता ज्याच्यामुळे तुमचे काम निर्विघ्नपणे पार पडू शकते. शहरात राहणार्या सदानंदला आई खूप आजारी असल्याचा निरोप आला. त्यामुळे तो लगेच गावी निघाला. कशीबशी एसटी मिळवून तो गावाजवळच्या फाट्यावर उतरला. तोवर सायंकाळ उलटून चांगलाच अंधार पडला होता. त्याचे गाव चार-पाच किलोमीटर अंतरावर होते. त्यामुळे फाट्यावर थांबून गावाकडे जायला कोणते वाहन मिळते का, याचा त्याने अंदाज घेतला. मात्र त्याला कोणतेही वाहन मिळाले नाही. आई आजारी असल्यामुळे घराची ओढ लागली होती. त्यामुळे त्याने पायीच जाण्याचा निर्णय घेतला. लवकर पोहचावे म्हणून सुरुवातीपासूनच त्याने वेग वाढविला होता. मात्र रस्ता खराब होता. वेडीवाकडी वळणे आणि खाचखळग्यांनी भरलेला रस्ता पाहून त्याला प्रारंभी राग आला. आपण कधी सुधारणार, असा प्रश्र त्याच्या मनात आला. आता तर तो रड्यालाच दोष देत पुढे निघाला. त्यामुळे साहजिकच त्याची चाल मंदावली. एकटाच असल्यामुळे रस्ता त्याला खायला उठला होता. सवयीचा असूनही तो कधी एकदा संपतो असे त्याला झाले होते. मात्र रस्ता संपता संपत नव्हता. थोड्या वेळाने त्याच्या मनातील विचार बदलले. लहानपणचे दिवस त्याला आठवले. शेजारच्या गावी शाळेत जाताना याच रस्त्यावरून आपण जायचो. त्यावेळी मित्रांबरोबर केलेल्या गमतीजमती त्याला आठवल्या. तो रस्ता त्याला एकदम जवळचा वाटू लागला. त्या रड्याशी आधी असणार्या मैत्रीचा साक्षात्कार त्याला झाला होता. त्यामुळे त्याने आता त्या रस्त्यालाच ‘सोबती’ केले होते. आता तो आनंदाने गावाकडे जात होता. त्यामुळे त्याचा चालण्याचा वेगही वाढला होता. रस्ताची ‘ सोबत’ करीत करीत सदानंद केव्हा गावात आला हे त्याचे त्यालाच कळले नाही आणि घरी आल्यानंतर तर त्याला पाहून त्याच्या आईचा आजार कधी बरा झाला हेही अनेकांना कळले नाही.
Be the first to comment
महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची
गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य
राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...
अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत
अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...
अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर
अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...
Leave a Reply