आठविते ते सारे आता
स्मृतींचीही कमाल आहे
गात्रे जरी झाली मलुल
मन, मात्र उत्साही आहे
अनुभवलेले जीवन सारे
जपुन पाऊले टाकित आहे
काय मिळाले अन हरविले
आता विसरून गेलो आहे
घडायाचे ते ते घडूनी गेले
अजूनी काय घडणार आहे
अंतरात वादळ गतस्मृतींचे
आज मात्र घोंगावते आहे
ललाटीच्या त्या रेषा साऱ्या
संचिताचे भगवंती दान आहे
आता व्हावे केवळ अंतर्मुख
विरक्तित खरा आनंद आहे
— वि. ग. सातपुते. (भावकवी)
9766544908
रचना क्र.१४२.
२६ – ५ – २०२२.
Leave a Reply