त्या वेळी मी पुण्यातल्या वाडिया कॉलेजमध्ये शिकत होतो. रविवार पेठेत मावशीकडे राहण्याची सोय होती अन् काही तरी रोजगार मिळविण्याचे प्रयत्न असत. घरचा, आई-वडिलांचा आधार नव्हता असं नव्हे; पण स्वत कमवावं आणि शिकावं अशी प्रवृत्ती होती. माझ्या मावशीच्या हाताला खूप चव होती. तिनं काहीही करावं अन् ते सर्वांना आवडावं, असं होतं. ती बटाटेवडे छान करायची. एकदा आमच्याकडे त्यांचे दीर आले होते. सहज गप्पा चालल्या होत्या. ते म्हणाले, `वहिनी, तू आमच्या शाळेत वडे का नाही विकत? छान खपतील. चार पैसे मिळतील.’ तेव्हा ते मॉडर्न हायस्कूलमध्ये लॅब असिस्टंट म्हणून काम करीत असत. झालं, चर्चेचं रूपांतर विचारात आणि योजनेत झालं. त्या वेळी माझ्याबरोबरच माणिक भंवर नावाचा माझा मित्रही मावशीकडे राहत असे. दरमहा 20 रुपये त्यानं द्यावेत आणि जेवून-खाऊन राहावं असं ठरलं होतं. त्यालाही पैशाची गरज होती. झालं, आमचं ठरलं. मावशीनं वडे रावेत आणि आम्ही ते गरमागरम शाळेत नेऊन विकावेत. दुपारच्या सुटीत शिक्षकांना एक छान, चवदार पदार्थ या सेवेतून मिळाला होता. 25 पैशाला एक वडा. त्या वेळी रस्त्यावर तो 10 पैशात मिळायचा. आमचा घरगुती, अस्सल म्हणून 25 पैसे. चांगला, दर्जेदार पदार्थ दिला, की जास्त पैसे द्यायला णी मागे-पुढे पाहत नाही, याचा अनुभव आला. गोविंद हलवाई चौक ते मॉडर्न हायस्कूल- रोज दुपारी आमच्या सायकली अशा पळत की कोणालाही वाटावे, वड्यांचा घाणा इथंच काढलाय. आमचा रोजचा रतीब सुरू झाला. रोज 30 वड्यांवरून संख्या 50-60 वर गेली. गुरुवारी-शनिवारी त्यात साबुदाण्याची खिचडीही सुरू झाली. टिकाऊ काही असावं म्हणून ज्वारीच्या फोडणीच्या लाह्याही देऊ लागलो. एकूण धंद्याला बरकत होती. रोज हातात काहीतरी रक्कम खेळती असे. मजा येत होती. आज 80 वडे करायचं असं ठरलं. त्याच दिवशी माझे
वडील आले. त्यांनाही हा
पदार्थ आवडे. जरा जास्तच वडे करायचा बे
झाला. आज त्यांच्या निमित्तानं आम्हालाही वडे खायला मिळणार होते. अन्यथा, रोज वड्यांबरोबर तयार होणाऱया छोट्या मण्यांवर आम्ही समाधान मानत असू. दुपारी एकच्या सुमारास पहिला डबा घेऊन माणिक रवाना झाला आणि अवघ्या वीस मिनिटांत मीही शाळेत खल झालो. आज शाळेत वेगळंच चित्र होतं. त्या वेळच्या शाळेच्या संचालिका जयश्रीबाई वैद्यांनी शाळेत बाहेरचा कोणताही पदार्थ विकण्यास प्रतिबंध केला होता. आता काय? हा प्रश्न आमच्यापुढे होता. बाहेर वडे विकावेत, तर इतरांचा वडा दहा पैशात; आमचा महागाचा वडा कोण घेणार? थोडा प्रयत्न ला. चार वडे विकले गेले. डबे अजून खूपच जड होते; पण आता घरी जाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. खालच्या मानेनं घरी आलो. काय झालं ते सांगू लागलो. आमचे पिताश्री घरी होतेच. आपले चिरंजीव अपयशी होऊन घरी आलेले पाहताच त्यांचा संताप झाला. त्यांनी शेलक्या शब्दांत आमची संभावना
— किशोर कुलकर्णी
Leave a Reply