माझ्या खूपशा अप्रकाशित कथानकांचा नायक म्हंटल तर वावगं ठरणार नाही, अशा जीवलग मित्रांवर काही चार पाच टिपण्या कराव्या असं सतत वाटत होतं… पण सतत शैक्षणिक कामाची माझी व्यस्तता अन् त्यात म्हणजे औचित्य सापडंना हे महत्वाचं……….. आपल्या जवळच्या व्यक्तीचं आस्तित्व, त्याची गरज समजण्यासाठी (थोडक्यात चिंतन) थोडेच क्षण असतात त्यामध्ये आत्ता वाढदिवसाची भर पडली….झुकेरबर्ग दादाच्या फेसबुक वर असंच मार्च अखेर पर्यत चे वाढदिवस बघत असताना नजरेस एक आगामी इव्हेंट सापडला… अन् त्या जीवस्य मित्रांबाबत टिपणी रेखण्यासाठी लेखणी उचलण्याचं औचित्य सापडलं… तसा हा मित्र माझ्याहुनही दोन चार वरीस थोरला पण आमची दोस्ती ही बालपणापासूनचं वर्गमित्र असावी अशी… या दोस्तांशी घष्टण व्हायला तसा बराच वेळ गेला.मी मतदान करण्यास पात्र व्हायला अन् ह्यो पंचविशी पार पडायला एका सहकारी दूध संस्थेमध्ये आम्ही दोघेही कार्यरत झालो, त्यावेळी मी त्याच्याहून दोन वरीस सीनिअर होतो या धंद्यात…. पण शिक्षणात ह्यो माझ्यापेक्षा वरचड त्यामुळे सेक्रेटरी म्हणून मानगुटीवर येवून बसला… असंच चार पाच वरीस एकत्र राहिल्यानं नातं अभेद्य झालं…… दादाबद्दल असणारी माझी निष्ठा अन् माझ्या वर त्याचं असणारं प्रेम याकाळात खूपच पराकोटीला गेलं. उठताबसता फोन व्हायचाच…..कामाच्या निमितानं सगळ्या मुलुख भर जुन्या बजाज गाडीवरनं फेऱ्या ठरलेल्या असायच्या……… या आमच्या जोडगोळीमुळे अनेकांच्या मनात वितुष्ट होतंच खरं.. कारण संस्था कामकाजात सक्रिय त्यामुळं अनेकांचा खुन्नसी रोष जाणवायचा.. सहज रोजच्या बोलण्यातून राजकीय उपदेश द्यायचं काम जुनेजाणते लोकं खूप अदबीने करत होते…
तसा विद्यार्थी जीवन अनुभवणारा मी अन् माझा जिवलग मित्र शशीदा हा कौटुंबिक परिस्थितीपुढे हतबल होवून शैक्षणिक प्रवास थांबवून प्रापंचिक जीवनात मग्न, तसं अजून शशीदा चं लग्न झालं नव्हतं पण आईवडील वृद्ध झाल्यानं कौटुंबिक डोलारा ह्याच्या खांद्यावर आलेला…….. तसं शशीदाचं प्रारंभीचं जगणं जरा कष्टप्रद गेलं… पोटापाण्यापुरती पुरेशी शेती, त्यातून निघणारं तोकडं उत्पन्न ह्यामुळे शिक्षणासाठी लागणाऱ्या खरचाकडे सतत नाईलाजाने दूर्लक्ष होत होतं… असंच शिकत शिकत वाणिज्य शाखेची पदविका घेण्यासाठी हा दशकापूर्वी पुणे शहरात वास्तव्यास होता… घराकडून येणाऱ्या पैशातून खर्च भागत नव्हता म्हणून कंपनी मध्ये नाईट शिफ्ट मध्ये रूजू होवून कसंबसं पदव्युत्तर अभ्यासक्रम ही पूर्ण केला… स्वप्न C.A होण्याचं होतं त्यामुळे खूप मेहनतीने शिफ्ट सांभाळून अभ्यास पण चालू होता.. पण नियतीचा डाव वेगळा होता कंपनी मध्ये शटडाऊन चालू झालं, हातंचा रोजगार गेल्यानं बेरोजगार तरूण ही बिरुदावली त्यात घरून येणारे पैसे शहरासारख्या ठिकाणी अपुरं पडू लागले… दिवस ढकलता येईनात… शेवटी स्वप्नांना तिलांजली देवून गाव गाड्याकडं यावं लागलं… आत्ता शेतकामाबिगार पर्याय नव्हता… उच्चशिक्षित आहे म्हणून हे काम करू हे म्हणता येत नव्हतं…. काही दिवसांनी आमच्या बा. ना संस्थेत सेक्रेटरी रूजू झाला… आत्ता जरा घडी बसत होती.. दुध उत्पादनात आत्ता विशेष लक्ष द्यायला सुरवात केली होती.. पूर्वापार दोनच असण्याऱ्या त्यात बी एक बांड असणाऱ्या म्हशीच्या गोठ्यात आत्ता पाऊण डझन वलाडूंन पार ढोरांचा कळप झालता… शेती कडे पण अभ्यासपूर्ण लक्ष त्यामुळे यशस्वी ऊस उत्पादकांच्यात नाव अग्रेसर होतं गेलं…. जिल्हाच्या ठिकाणी तहसिल ठिकाणी भरलेल्या कृषीप्रदर्शनामध्ये दुचाकी वरुनच आम्ही दोघे एक सॅंपल म्हणून पाच उसांची एक मोळी स्पर्धेत ठेवून यायचो.. दोन तीन दिवस प्रदर्शनात उसाजवळची पाटी वाचून नाव चरचिलं जायचं…. कधी कधी नंबर बी यायचा तर कधी कधी फक्त प्रोत्साहनपर नुकती थाप चं मिळायची….. सतत चाललेल्या शेतीतील प्रयोगामुळं तालुक्याचं कृषी खातं लईच जवळ घ्यायला लागलं… तालुक्यातील शेतकऱ्यांना दाखवायला प्रगत शेतकरी रुपी एक उत्साही तरूण चेहरा मिळाला… आमच्या गावपाढंरीत तर कृषी अधिकाऱ्यांचा मुक्काम बसू लागला…. अनेकविध योजना राबवण्यात येवू लागल्या, प्रबोधन पर व प्रगत शेतीशी निगडीत कार्यक्रम शशीदा च्या मदतीने गावात पार पडू लागले…. अवकाळी येणाऱ्या पावसानं अन् कीडीमुळं शेतकरी हतबल होतं होता त्याना शासनाच्या मदतीची गरज होती.. पण अधिकारी तिथं पर्यत पोचत नव्हते… पण हा हरहुन्नरी तरूण अख्खं कृषी खातं बांधापर्यत नेवून पंचनामा करून घेण्यास मदत करत होता… त्यामुळे त्याची गौरवाखातर तालुकापातळीवर कृषी मित्र निवड झाली.. अजून तो कृषी मित्र म्हणून कार्यरत आहेचं…. दुग्ध व शेती व्यवसायातून मोबदल्यातून मोठी स्वप्न पूर्ण होणार नाहीत म्हणून नव्या रोजगाराच्या संधी ही शोधू लागला… तितक्यात कीपॅड 4G फोनचा चा विक्रेता म्हणून पर्यायी काम पण शोधलं.. आत्ता तालुक्यात घराघरात कीपॅड चा फोन पोचवण्यात हा पुढं.. या तुफान मानधन ही मिळत होतं.. हळूहळू आर्थिक घडी बसवत बसवत हा तरूण वाटचाल करत होता..
हा सगळा प्रवास मी जवळनं बघत होतो.. काही वेळा मैत्री खातर मीही रविवारी सुट्टी चा त्यांच्या कंपनीने ठरवलेल्या गावात त्याच्या बरोबर जात होतो… ह्या व्यवसायातून दादाच्या खूपशा ओळखी वाढल्या.. आत्ता गावोगावी गाडीवरून फेरफटका मारत असता सतत हात वर करावा लागत होता…. काही फोनच्या तांत्रिक अडचणी असतील तर कस्टमर आॅफीस ऐवजी दादालाच लई फोन यायचे… पण त्रास न मानता तो अडचणींच निरसन करत गेला… तालुक्यातील कंपनीच्या आॅफीस मध्ये ग्राहक लोकांच्या तोंडून फक्त दादाच्या कामाची स्तुती व्हायची… हे असंच दोन वरीस चाललं नंतर कंपनीने ही त्याची तालुक्याच्या आॅफीस मध्ये मॅनेजर पदी निवड केली…. आत्ता कायमस्वरूपी नोकरीचा प्रश्न संपला होता.. फक्त जवळच्या लोकांना वेळ देता येत नाही ही खंत तो बाळगून होता.. नोकरी दहा बारा तास करत असल्याने आमचा ही फोन आत्ता वरचेवर कमीच होतं गेला…. पदव्युत्तर शिक्षणासाठी मीही स्थलांतरित झालोय आत्ता … पण अजूनही माझी ख्यालीखुशाली करण्यासाठी आठवड्यातून रविवारी नक्की एक फोन येतोच… आर्थिक मदत पण आहेच मला वरचेवर…. तसं जीवन सुखसमृद्धीचं चालू आहे हल्ली त्याचं… यंदा त्याच्या लग्नाचं पण सुरू आहे.. यंदा रस्सा भात फिक्स हायच, अशी दाट चिन्हे दिसतायत…………शशीदा च्या वाढदिवसाच्या निमित्ताने जुन्या अनेक आठवणींना उजाळा मिळाला.. एखाद्या चा वाढदिवस असला कि हल्ली प्रत्येक जण WhatsApp च्या स्टेटस (हे तर मुखपत्र याचं बरं) च्या माध्यमातून भरमसाठ शुभेच्छा देतात… मोठ्या आसामी चं वळख ना पाळख खरं, छायाचित्र लावून आपली पोच कुठं पर्यत आहे हे स्वारस्य दाखवतात… पण आम्ही थेट संपर्क ध्वनीवरून संपर्क केल्यानंतर, खूपशी बाष्कळ बडबड संपत संपत असताना शुभेच्छांचा योक शबोद देताव एकमेकांना… पण या शुभेच्छा पूर्वक शब्दांत खूपशा भावना दडलेल्या असतात अन त्या अचूक पोचतात ही……. गेली दोन वर्षे फक्त फोनवरून शुभेच्छा देतोय कारण सेमिस्टरची परिक्षा नेमकी याच्या वाढदिवसादिवशीच…… पण ह्या वेळी चित्र वेगळं होईल … परीक्षा लांबणीवर आहेतच.. त्यात वाढदिवस ही जंगी करता येईल असं नियोजन आखलयं त्याच्या माघारीचं हं…… आमच्या सुखादुखःत सहभागी असणाऱ्या अवलियाचा वाढदिवस 30 मार्च रोजी साजरा करण्याचं निश्चितच मनोमनी ठरवलंय… तसा शशीदा माझ्या सारख्या असंख्य तरूणांना आदर्शवत आहे…. परिस्थिती वर मात करण्याचं सामर्थ्य तर वाखाणण्याजोगं आहे… त्याच्या वाढदिवसाच्या निमित्ताने त्याच्या चरित्राचा वृतांत मांडता आला…. वाढदिवसाच्या दिवशी तर सोशल माध्यमातून माझी लेखणी झुंजार पणे शुभेच्छांचा ढीग पाडेलंच…… त्यामुळे आत्ता पुरेसं शब्द जरा थोपवतो….
शब्दाकंन – गजानन साताप्पा मोहिते
Leave a Reply