नव्हतो कधींही कवि वा लेखक
कसे घडले कांहीं न कळले
साहित्य सेवेचा गुण मिळूनी
काव्य मजला सूचू लागले १
वाङ्मयाविषयी प्रेम होते
वडीलांना त्या काळी
अथांग ज्ञान त्यांनी मिळविले
पुस्तके वाचूनी सगळी २
खो – खो मधल्या खेळा सारिखे
खो देत ते गेले बसूनी
साहित्याची ठेव सोपवूनी मज
ते गेले चटकन निघूनी ३
गोंधळून गेलो होतो मनीं
नव्हते ज्ञान कांहीं मजला
बरसत असतां त्यांचे ज्ञान
छिद्रे होती मज झोळीला ४
कुणीही नसता मार्गदर्शक
घडत होते सारे अवचित
चेतना देण्यास मज लागी
आशिर्वाद त्यांचा होता सतत ५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply