ज्या लोकांची ऐपत नव्हती त्यांनी पण गाडी घेतली आणि ज्यांची ऐपत असून गरज नसताना चार चार गाड्या पण घेऊन झाल्या आहेत . वाहन उद्योगाला लागलेली मंदी यामुळे टीका करणारे विचारवंत लोकहो जरा विचार करा की, ज्यांच्या कडे गाड्या नसतील त्यांनी आता त्यांच्याकडील जागा जमिनी किंवा स्वतः चे राहते घर विकून किंवा कर्ज काढून गाड्या घेतल्या पाहिजेत का जेणेकरून असे केल्याने वाहन उद्योगाची मंदी निघून जाईल.
याच वाहन उद्योगात जेव्हा मनुष्यबळा ऐवजी अत्याधुनिक प्रोडक्शन लाईन आणि रोबोट वापरून भरमसाठ प्रोडक्शन काढण्यासाठी अब्जावधी रुपये इन्वेस्ट केले जात होते तेव्हा त्यांनी मागणी आणि पुरवठ्याचा विचार केला नव्हता का.
पार्ले बिस्कीट कंपनी तोट्यात जातेय म्हणून कर्मचारी कपात किंवा कंपनी बंद होईल असे बोलणाऱ्या लोकांनी पार्ले बिस्कीट खावे आणि दुसऱ्यांना पण खायला द्यावे. दुधात, चहात, पाण्यात आणि इव्हन व्हिस्की मध्ये पण पार्ले बिस्कीट बुडवून खाताना लोकांचे व्हिडिओ बघण्यात आले आहेत. 35 ते 40 रुपयांना फक्त पाच किंवा सहा मिलानो किंवा डार्क फॅंटसी ची बिस्कीट खणाऱ्यांना डाएट आणि फायबर वाली बिस्कीट खणाऱ्याना पार्ले बिस्कीट खायला सांगाल का. दहा बारा वर्षांपूर्वी नव्हते ना असे क्रीम वाले आणि तोंडातून लाळ टपकावायला लागणारे बिस्कीट ब्रँड. पूर्वी लहान मुलांना पाहुणे खाऊ म्हणून पार्ले बिस्कीट न्यायचे. आता किंडर जॉय नाहीतर डेरी मिल्कचा सिल्क ज्यामध्ये सहज पार्ले चे चार पाच पुडे नेता येतील.
एकीकडे वाहन उद्योग आणि पार्ले वर मंदी आली असताना दारू विक्रेते आणि निर्माते यांना सुगीचे दिवस आलेत ते नाही दिसत कोणाला.
काम करणाऱ्यांना कामाची कमी नाही आणि अशा वायफळ चर्चा आणि विचार करायला वेळ पण नाही. जरा बघा आपल्या आजूबाजूला लोकं कशी कमवतात आणि कष्ट करतात आणि सुखी असतात.
©प्रथम रामदास म्हात्रे
मरीन इंजिनियर
कोन, भिवंडी, ठाणे.
Leave a Reply