वकील जातचं लय चतूर
प्रसंग – काल सकाळी…
स्थळ – सांगली स्टेशन…
फस्ट क्लास ए.सी. बोगीत आपला एक वकील एकटाच.
कोल्हापूर जवळ असल्याने बोगी जवळपास रिकामी…
एक स्त्री त्यांच्या कंपार्टमेंट मध्ये आली…
“तुमच्या जवळचा सगळा किंमती ऐवज काढा नाही तर मी आरडा ओरडा करेन की तुम्ही माझी छेड काढली म्हणून !!”
वकीलांनी साहेबांनी शांतपणे कागद पेन काढला…
त्यावर लिहीलं…
“मी मुकबधीर आहे…मला बोलता येत नाही ;ऐकू येत नाही… तुम्हाला जे काही सांगायचं आहे ते या कागदावर लिहून द्या..”
बाई जे बोलली ते तिनं लिहून दिलं…
त्या वकीलांनी ते वाचलं…
कागदाची घडी करुन खिशात ठेवला आणि म्हणाले..
“हं…
बोंबला जोरात आता कि मी तुमची छेड काढली म्हणून,
माझ्याकडे तुमच्या हस्ताक्षरातली चिठ्ठी आहे पुरावा म्हणून ”
बाई पळाली ना सैराट !!!!
वकिलांचा नाद करायचा नाय !
Leave a Reply