मराठी जन अभियान दिन निमित्त माझ्या नातवाने एका शब्दाचा वाक्यात उपयोग केला ते पाहून छान वाटले. शाळेत झऱ्यावर धडा असावा त्यात उल्लेख असावा पाणी शिथिल झाले. खळखळाट आणि ओघ कमी झाला असतानाचे वर्णन…
त्याच्या आईने आयस्क्रीम आणले होते आणि मलाही एका वाटीत दिले. ते घेऊन तो आला होता आम्हा दोघांनाही आज्जी नातवाचे अत्यंत आवडते आयस्क्रीम ते देऊन म्हणाला आज्जी हे खाल्ले की तुमचे मन शिथिल होईल. खर तर सकाळ पासून मी थोडी अस्वस्थ होते पण त्याचे हे बोलणे ऐकून मी एकदम खुश. मी म्हटलं अरे आज अचानक कसे काय शिथिल हा शब्द वापरला आहेस. तसा तो म्हणाला की आज मराठीदिन आहे म्हणून या शब्दाचा उपयोग केला आहे. पण बरोबर आहे ना शाळेत शिकवला होता म्हणून. पाण्याचा प्रवाह जसा शांत होतो. तसेच आयस्क्रीम खाल्ले की मन शांत होईल असे त्याला वाटत असेल म्हणून…..
बाहेरच्या जगात मराठीदिन कसा साजरा झाला हे मला माहित नाही पण माझ्या घरात तो खऱ्या अर्थाने साजरा झाला आहे त्यातून खात्री आहे की लवकरच पुढील पिढी माय मराठीला नक्कीच विसरणार नाहीत. इंग्रजी शिकणे गरजेचे आहे म्हणून मातृभाषा विसरुन चालणार नाही….
— सौ. कुमुद ढवळेकर.
Leave a Reply