समाजमाध्यमांवर काल एकच धमाल होती,
Valentine शुभेच्छा दुसरी पोस्ट नव्हती.
Valentine प्रेमाच्या लाल लाल रंगात –
कुणी अगदी विरोधी सूर लावत होतं ,
“प्रेमाचं नुसतं प्रदर्शन” वर हे ही ठेवून देत होतं.
ही मंडळी नेहमीच अशी का असतात ?,
छान , गोड गोष्टींना नावं का ठेवतात ?
“हा डे कोणाचा ? कुणी सुरू केला ?” –
“आपली संस्कृती” एव्हढा विचार कशाला ?.
काही न करता हात चोळत बसायचं –
आजची पिढी या विषयावर बोटं मोडत राहायचं.
जसं दार सकाळी उघडलं घराचं ,
तरुण जोडपं बाहेर, पडत होतं समोरचं.
ताजी, टवटवीत छान हसरी जोडी –
त्याचा काळा टीशर्ट , तिची लाल साडी.
“Happy valentine’s डे”, नकळत wish केलं-
दोघांना ,
आपल्याच नादात मस्त होती, भानही कुणाचं –
नव्हतं त्यांना.
हुरूप आला मला, अन् उसकू लागलो कपाट,
ही म्हणाली “काय चाललंय,का लावताय घड्यांची –
वाट ?”
म्हटलं, “बाहेर पाहिलंस का? महापूर आलाय प्रेमाला,”
टीशर्ट जीन्स चढवू , हात मिळवुया हाताला.
“तूच माझी व्हॅलेंटाईन”, हळूच कानी म्हटलं ही ला,
खूप गोड लाजली अन् , हात अलगद हातात आला.
प्रासादिक म्हणे,
— प्रसाद कुळकर्णी.
Leave a Reply