व्हॅलेंटाईन डे दिवस प्रेमाचा
प्रेमाच्या दिवशी प्रेमानेच साजरा करण्याचा…
हा दिवस म्हणजे त्याचा स्मृतीदिन
ज्याने आपल्या प्रेयसीला आपल्या रक्ताने
विक्रम केला पन्नास हजार शब्दांचे
प्रेमपत्र लिहिण्याचा…
तो विक्रम आता कधिही मोडणार नाही
कारण कोणताही प्रियकर यापुढे
आपल्या प्रेयसीवर पाचशे शब्दही
लिहू शकणार नाही…कारण
त्याने विक्रम केला आहे फक्त
तिच्या देहात गुंतण्याचा…
जगभरात हा दिवस आहे प्रत्येकाचे
प्रत्येकावरील प्रेम व्यक्त करण्याचा…
आपल्या देशात मात्र हा दिवस आहे
प्रेमाचाच दिवस करण्याचा…
प्रेम सर्वव्यापी आहे पण आज
प्रेमाची व्याख्या मात्र संकुचित झालेली आहे
माणसाच्या मनासारखी !
त्यामुळे हा दिवस त्यानेच साजरा करावा
ज्याला खरा अर्थ माहीत आहे प्रेमाचा…
प्रेम गुलाबी आहे हेच लक्षात ठेवावे प्रत्येकाने !
ह्या दिवशी त्याला रंग देऊ नये रक्ताचा…
प्रेम हे फक्त देण्यासाठी असते
ते ओरबडण्यासाठी नसते…
दिवस हे लक्षात घेण्याचा…
हा दिवस आहे आपल्या प्रेमावर
प्रेमाने निदान चार शब्द लिहिण्याचा…
या दिवशी गुलाबी रंगात रंगण्यात
काहीच वाईट नाही
फक्त गरज आहे ती आपल्या हृद्यातील
गुलाबी रंग नव्याने शोधण्याचा…
या दिवशी प्रेम व्यक्त करा
पण प्रेमाने प्रेमाशी !
ते स्विकारणे न स्विकारणे
प्रेमावर सोडा प्रेमाने !
धडा देत निस्वार्थीपणाचा…
या प्रेमाच्या दिवशी सर्वानाच
आपले प्रेम मिळत नाही पण
तरीही हा दिवस हक्क हेरावून घेत नाही
कोणाचा कोणावर प्रेम करण्याचा…
हा दिवस कित्येक प्रेमी जिवांना
उर्जा देतो पुढचे कित्येक दिवस
प्रेमात रंगण्याची आणि आदेश देतो
प्रेम समजून घेण्याचा…
या दिवशी मला माझे प्रेम
कधीच मिळाले नाही
म्हणून काय झाले…
मला अधिकार तर मिळाला
जगावर प्रेम करण्याचा…
©कवी- निलेश दत्ताराम बामणे ( एन.डी.)
Leave a Reply