वाळू हाती न राहती
न नशिबाच्या रेषा
मिळोनि सारे ओठी येते
वेडीवाकडी भाषा
देवगुणी येथे नाहीच कोणी
दानवांचाच पसारा
देवगुणी न देव राहिला
स्वतःलाच विचारा….
अर्थ:
वाळू हाती न राहती, न नशिबाच्या रेषा
(शाश्वत असं काहीच नाही. बदलत असतं सारं, मग एखादी गोष्ट जितकी आपण जास्त साठवून ठेवण्याचा प्रयत्न करतो तितकी ती आपल्याकडून जास्त निसटत जाते.)
मिळोनि सारे ओठी येते, वेडीवाकडी भाषा
(आपल्याला हवे ते मिळत नाही म्हटल्यावर मग तो पैसा असेल किंवा कोणतंही सुख माणूस संयम सोडुन वागतो आणि तिथेच त्याची खरी परीक्षा असते.)
देवगुणी येथे नाहीच कोणी, दानवांचाच पसारा
(कलियुगात निर्मळ मनाची व्यक्ती, सोज्वळ स्वभावाचं कोणी मिळणं फार कठीण, इथे मुखवटे लावून फिरणारे दानव जास्त.)
देवगुणी न देव राहिला,स्वतःलाच विचारा.
(देवही आता त्याने जन्माला घातलेल्या माणसाचा पाईक झालाय, त्यातलं देवत्व बाकी ठेवलंच नाहीये माणसाने. नदीला जेव्हा पूर येतो तेव्हा आजूबाजूचा माणूस आनंदित होत नाही तर त्या पाण्यापासून लांब जायचा प्रयत्न करतो.)
— सुमंत परचुरे.
Leave a Reply