वाटले मजला आहे मी हुषार, मिरविला टेंभा अकलेचा,
होतो गुलाम मी, अहंकार जोपासुनि मनीं, माझ्याच मूर्खतेचा ।
खाऊनि ठोकरा अनेक, स्वानुभावें घेतला वेध, माझ्याच मी मनाचा,
सव्यांत पाहूनि तया, सखा अहंकार, गवसला मार्ग चिन्मयाचा ।
मजसि गवसला मार्ग चिन्मयाचा ।।१।।
धुंदीत यौवनाच्या नि जोमांत अंगीच्या, वाटले आहोत आम्ही शहाणे,
झेप होती गगनावरी, ऐकले न कधी गुरुजनांचे, मस्तीत अज्ञा नाकारणे ।
घोड दौडीत, जाहले घोडे जेव्हां लंगडे, हातीं अमुच्या उरले फक्त रडणे,
नव्हतो आम्ही अविचारी तितुके, क्षणी उमगले मनां, चरणतयाचे धरणे ।
क्षणी उमगले मनां, चरणतयाचे धरणे ।।२।।
देखुनि व्याधीअन् दैना जनांची, नाही जाहलो जगीं कधी निराश,
सागरीं संकटांच्या, नाही डगमगलो, अन् झालो न कधी हताश ।
जरी राहिल्या यातना या बेगडीच्या, वाटले न आयु हे भकास,
नामातुनि तयाच्या, श्रोत होता स्फूर्तीचा, शिकलो जीणे हे झकास ।
आम्ही, शिकलो जीणे हे झकास ।।३।।
कृपेने तयाच्या, जरी वाढलो आम्ही जगतीं, जाण नव्हती कशाची,
तयाच्याच प्रसादें, शिकलो थोडे बहुत, परी न गवसली वाट ज्ञानाची ।
आलो येथवरी “जयाच्”च्या मर्जीने, नसेल वानवा मज शांती सुखाची,
ग्वाही मज, होईल कृपा गजाननाची, धरतांच कास या ताई चरणांची ।
धरतांच कास या ताई चरणांची ।।४।।
— सुरेश वासुदेव नाईक उर्फ गुरुदास
Leave a Reply