विष्णूंचा तिसरा अवतार वराह होय. याची जयंती भाद्रपद शुद्ध तृतीयेला असते. हा अवतार हिरण्याक्ष नावाच्या असुराला मारण्यासाठी झाला असे उल्लेख आढळतात. याचे दुसरे नांव यज्ञवराह असेही आहे.
या अवताराविषयी निरनिराळ्या कथा आहेत. हिरण्याक्ष नावाचा राक्षस पृथ्वीचे हरण करून पाताळात घेऊन गेला म्हणून विष्णूंनी वराहाचे रूप घेवून आपल्या सुळ्याने पृथ्वीला पाताळातून वर काढले. नंतर हिरण्याक्षाचा वध केला.
या अवताराच्या मूर्ती अनेक ठिकाणी आहेत. त्यातील बऱ्याच मूर्ती धड माणसाचे व मस्तक वराहाचे (डुकराचे) अशा प्रकारच्या आढळतात.
अभिलषितार्थ चिंतामणी मध्ये मूर्तीचे स्वरूप दोन पाय, एक पाय कासवाच्या पाठीवर, दुसरा पाय शेषाच्या मस्तकावर, एक हात कमरेवर, एका हातात गदा, तिसऱ्यात दाढेने उचललेली पृथ्वी व चौथ्यात कमळ, शरीर मोठे, डुकरासारखे व दाढा तीक्ष्ण असे सांगितले आहे.
Leave a Reply