नवीन लेखन...

वराहकणींचे झाड, शेतकर्‍यांना मिळवून देईल घबाड !!!

भारतीय उपचार पद्धतीला हजारों वर्षांची परंपरा लाभली आहे. तसेच हजारो वनस्पतींचा वापरही होत आलेला आहे. कितीतरी वनस्पती घराघरांत सहजतेने वापरण्यात येत आहेत. शेकडो वनस्पती आमच्या दैनंदिन आहाराचा भाग झालेल्या आहेत, आमच्या पूर्वजांनी सांगितलेले औषधी तत्व विसरलो असलो तरी मात्र प्रत्यक्ष अप्रत्यक्ष वापर सुरूच आहे. इंग्रजी आक्रमणानंतर पाश्चात्य संस्कृतीचा पगडा, भारतीयांवर हळूहळू वाढत गेला. पाश्चात्य संस्कृतीच्या अंधानुकरणाने, आपले ते त्याज्य परकीय ते पूज्य वाटू लागले.

आज परिस्थिती बदलतांना दिसत आहे, संपूर्ण वैधकशास्त्रांना दिशा देणारे आयुर्वेद पुनश्च आपली जागा घेत आहे. औषधांच्या जागतिक बाजारपेठेचा विचार केल्यास भारतीय शेतकरी व वैधकशास्त्रांचे अभ्यासक यांना खूप संधी निर्माण होत आहे.

आयुर्वेदातील ग्रंथांमध्ये हजारों वनस्पतींची माहिती दिलेली आहे, मात्र त्यांचा शोध घेणे आवश्यक आहे. अश्वगंधा ह्या अनुपम्य औषधीचा प्राचीन ग्रंथांमध्ये पुढीलप्रमाणे उल्लेख आढळतात –

“ अश्वगंधा निलश्लेमश्वित्रशोथक्षयापहा |
बल्या रसायनी तिक्ता कषायोष्णाति शुक्रला ||” (भाव प्रकाश)

“ पिताश्वागंधा पयसार्धमासं घृतेन तैलेन सुखाम्बुना वा |
कृशस्य पुष्टिं वपुषो विधत्ते बालस्य सस्यस्य यथाम्बूवृष्टि || ” (चरक)

“ शिशिरे यो अश्वगंधायाकन्दचूर्ण फ्लोन्मितम् |
मासमत्ति समध्वाज्यं स बृद्धोपि भवेधुवा || ” (रा.मा.)

असे विविध उल्लेख असलेल्या ह्या दिव्य औषधीची नावे पुढीलप्रमाणे :-
कुळनाव– Solanaceae
लटिन नाव- Withania Somnifera Linn.
संस्कृत नाव- अश्वगंधा, वराहकणीं, बलदा, वाजनी
मराठी नाव- अश्वगंधा, आस्कंद, ढोरगुंज
हिंदी नाव- असगंध नागौरी, अश्वगंधा,
इंग्रजी नाव-Winter cherry.

विविध ताकदवान औषधांच्या निर्मितीत वापरली जाणारी, अश्वगंधा ही झुडूपवर्गीय वनस्पती असुन, सामान्यता भारतात मध्यप्रदेश व महाराष्ट्रात आढळून येते. भारताशिवाय स्पेन, मोरोक्को, इस्त्राईल, बलुचीस्थान व पूर्व आफ्रिकन देशांमध्ये उत्पादित केली जाते. ह्या वनस्पतीच्या झाडाला हातावर घासले असता घोड्याच्या मुत्रासारखा हिचा गंध येतो.

मध्यम व हलक्या जमिनीत सहजतेने होणाऱ्या ह्या वनस्पतीला पाण्याचा निचरा होणे आवश्यक आहे. ६५० ते ७५० मी.मी. पावसाचे प्रमाण असणाऱ्या क्षेत्रात ह्या वनस्पतीचे उत्पादन होते. १७० ते २०० दिवसांमध्ये निघणारे हे पिक औषधीशेतीसाठी फार उपयुक्त आहे.

रासायनिक घटक :- अश्वगंधाच्या मुळांमध्ये ०.१५ ते ०.३५ टक्के अल्कोलाईड असते. विथानाईन, सुडो विथाईन, सोमेनिफेरान, विथानी नाईन, विथेनाल, विथासोमनाईन ही मूलद्रव्य असतात. क्रिस्टेलाईन अल्कोलाईड व फाईटोस्टेराल आदी घटक आढळतात.

गुणधर्म :- कफ-वात नाशक, बल्य, वृहण,दीपक, पाचक.

औषधी उपयोग :- अश्वगंधाची मुळे पौष्टिक आहेत. हृदयरोग, कमरेचे विकार, हृदयाचे दुखणे, अशक्तपणा, बलसंवर्धन, गर्भधारणेसाठी, गर्भवाढीसाठी, शुक्रपेशीवाढीसाठी तसेच नपुंसकत्व जाण्यासाठी ह्याचा वापर होतो. ह्याशिवाय उचकी, खोकला, श्वासनलिकादाह, कफ, मळमळ, गर्भपात रोखण्यासाठी, रक्तप्रदार, श्वेतप्रदर, बद्धकोष्ठ, थंडी, दमा, वात, सांधेदुखी, गजकर्ण, नायटा, त्वचारोग, मूत्राशयाचे विकार,क्षय आदी आजारांवरील औषधीनिर्मितीमध्ये याचा वापर होतो. याचा वापर मात्र तज्ञाच्या सल्ल्यानेच करावा.

अशाप्रकारे बहुउपयोगी असलेल्या ह्या वनस्पती पासून एकरी ३ ते ५ क्विंटल वाळलेल्या मुळांचे व ४० ते ५० किलो बियाचे उत्पादन मिळते. मुळांना ७५ ते १०० रुपये प्रती किलो भाव मिळतो. ह्या अनुपम्य औषधीची शेती केल्यास शेतकऱ्यांना अधिक फायधाची ठरू शकते.

जेष्टमाध ही झुडूपवर्गीय वनस्पती आहे. लागवड करतांना सरीवरंब्याच्या पद्धतीने लावावे. दोन सरीत ६० से.मी.अंतर असावे. दोन रोपात ३० ते ४५ से.मी अंतर असावे. एकरी १०० ते १३० किलो ओल्या मुळ्यांचे बेने वापराने. बेण्याच्या उपलब्धतेसाठी जिल्हा उधोग व मार्गदर्शन केंद्रातील कृषीविषयक अधिकाऱ्यांशी संपर्क करावे, ते बेने उपलब्धतेसाठी साहाय्य करतील.

नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश
About नरेंद्र श्रावणजी लोहबरे उर्फ नरेश 78 Articles
व्यवसायाने शिक्षक असलेल्या श्री नरेंद्र लोहबरे यांना विविध विषयांवर लेख तसेच कविता लिहिणे फार आवडते. देशविदेशातील प्राचीन तथा अर्वाचीन नाणे व चलनाचा संग्रह करण्याचा त्यांना छंद आहे. पर्यटन, पक्षी निरीक्षण, छायाचित्रण, रक्तदान करणे, रक्तदान शिबिरांचे आयोजन करणे आदी बाबींचेही छंद आहेत. आयुर्वेदिक वनस्पतींचे जतन करणे आवडीचा विषय आहे.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..