|| हरी ओम ||
वारी आषाढीची !
नाम वारीचे घेता
पंढरपूर आठवे भक्ता !
चंद्रभागेच्या तिरी
विठ्ठल विठ्ठल नाम गजरी !
जप तप नाम हाची लळा
हाची पांडुरंगाचा सोहळा !
जया मनी गोड भाव
तया सावळ्याचा तो ठाव !
भक्तीरसात डुंबावे
कैसे इतरा सांगावे !
स्वहानुभावे वेचावे
पांडुरंगी तल्लीन व्हावे !
ऐसा वारीचा सोहळा
जैसा आषाढीचा मेळा !
कृतकृत्य होतसे जीवा
मनी आठवून आठवावा !
होता पांडुरंगाचे दर्शन
जाहले कोट कल्याण !
ऐसा दर्शन सोहळा
कुठे पहिला म्या डोळा !
— जगदीश पटवर्धन
लेखकाचे नाव :
जगदीश पटवर्धन
लेखकाचा ई-मेल :
japat@ymail.com
Leave a Reply