तप्त होतां धरणी माता, शांत करी वर्षा तिजला
प्रफुल्लतेचे झरे फुटती, आंतूनी त्या मातीला…..१,
जलमय होती नदी नाले, दुथडी भरूनी वाहती
धबधब्यातील खरी शोभा, वर्षामुळेंच दिसती…२,
हिरव्या रंगीं शाल पसरते, धरणी माते वरी
ऊब यावी म्हणून मेघांचे, आच्छादन ती करी….३,
वर्षा धरती बहिणी असूनी, प्रभूची भावंडे
उचंबळूनी प्रेम येतां, धावून येते तिजकडे….४.
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply