नियोजनाच्या लागून मागें,
भविष्याची आखतो चौकट
कल्पकतेच्या आहारी जावून,
चालण्या विसरे पावूल वाट….१,
अनेक वाटा दिसूनी येती,
भविष्यामधळ्या कल्पकतेला
वर्तमान त्या काळाकरिता,
जावे लागते एकाच दिशेला…२,
उठूनी करा त्याच क्षणीं ते,
वृत्ति असावी अशीच सदा
उद्यांवरती कार्य टाकतां,
मनीं उमटती विचार द्विधा…३,
वर्तमान हा निश्चीत असता,
यश लाभते अनेकदा
केवळ तुमची बघुनी धडपड,
साथ देईल ईश्वर सदा….४
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply