वास्तव! हे प्रतिबिंब अंतरीचे
तेही तरळते तुझ्याच लोचनी
तरीही कां? हे रुसणे फुगणे
नको त्रागा उगा, घे समजुनी
पाहिले किती? उनपावसाळे
सत्यता! ती जाण नां जीवनी
ओल्या मातीत, जिरते पाणी
प्रीत! रुजते कोवळ्याच मनी
हिरव्या प्रीतवेली फुलती फुले
सुगंधा! तीच दरवळते जीवनी
मनी, ही सारी साक्षात प्रचिती
आत्म्यास! मन:शांती जीवनी
–वि.ग.सातपुते.(भावकवी)
9766544908
रचना क्र. ६७
१ – ३ – २०२२.
Leave a Reply