वासुदेव बळवंत फडके (नोव्हेंबर ४, १८४५:शिरढोण, महाराष्ट्र – फेब्रुवारी १७, १८८३:एडन) हे भारतीय क्रांतिकारक होते. त्यांना भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील आद्यक्रांतिकारक किंवा सशस्त्र क्रांतीचे जनक मानले जाते.
जन्म: नोव्हेंबर ४, १८४५
शिरढोण, पनवेल तालुका, रायगड जिल्हा, महाराष्ट्र, भारत
मृत्यू: फेब्रुवारी १७, १८८३
एडन, येमेन
चळवळ: भारतीय स्वातंत्र्यलढा
धर्म: हिंदू
प्रभाव: महादेव गोविंद रानडे, क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवे
वडील: बळवंत फडके
रायगड जिल्ह्यातील शिरढोण गावात जन्मलेल्या फडक्यांचे आजोबा नजीकच्या कर्नाळा किल्ल्याचे किल्लेदार होते. लहानपणीच फडक्यांना कुस्ती, घोडेस्वारी आणि तलवारबाजीचे प्रशिक्षण मिळाले. माध्यमिक शिक्षण संपल्यावर ते पुण्याला आले व सदाशिव पेठेतील नरसिंह मंदिराजवळ राहून इंग्रज सरकारच्या सैन्य लेखा सेवेत भरती झाले.[१] येथे असताना त्यांच्यावर महादेव गोविंद रानड्यांचा प्रभाव पडला व भारताच्या खालावलेल्या आर्थिक परिस्थितीचे कारण ब्रिटिश धोरणे होती असे त्यांच्या लक्षात आले. त्याचवेळी फडके क्रांतिवीर लहुजी वस्ताद साळवेंच्याही प्रभावात होते. साळव्यांनी ब्रिटिशांपासून स्वातंत्र्य मिळवण्याचे आणि मागासलेल्या जातींनाही या लढ्यात सामील करून घेणे महत्त्वाचे असल्याचे फडक्यांना पटवून दिले.
वासुदेव बळवंत फडके हे पुण्यातल्या महाराष्ट्र एज्युकेशन सोसायटीचे पहिले सेक्रेटरी आणि ट्रेझरर होते. 1873 मध्ये स्वदेशी वस्तू वापरण्याची शपथ घेतली. तसेच समाजामध्ये समानता, ऐक्य, समन्वय निर्माण करण्यासाठी’ऐक्यवर्धिनी संस्था’ सुरू केली. त्यांनी पुण्यामध्ये 1874 मध्ये ‘पुना नेटिव्ह इन्स्टिट्युशन’ ही शाळा सुरू करून स्वदेशीचा पुरस्कार करण्याचा प्रयत्न केला.
वासुदेव बळवंत फडके हे दत्त उपासक होते. त्यांनी दत्तमहात्म्य हा सात हजार ओव्यांचा ग्रंथ लिहिला.
”दधिची ऋषींनी आपल्या अस्थीही देवासाठी दिल्या;मग हे भारतीयांनो,मी आपला प्राण तुमच्या साठी का देऊ नये?” – वासुदेव बळवंत फडके.
भारतीय सशस्त्र क्रांतीचे जनक हुतात्मा वासुदेव बळवंत फडके यांच्या १७२ व्या जयंती निमित्त त्यांच्या देश सेवेस त्रिवार वंदन…
जय हिन्द
Leave a Reply