गळे अवसान सारे
फुटे कणसाला तुरे
चुलीत घाला तुमचे
वांझ दौऱ्यावर दौरे!
कापसाच्या होई वाती
विम्याचं रिकामे पोते
निवडून दिलेले घोडं
कंपन्याची पेंड खाते !
खतात लूट,बियांत लूट
आडत्याचीही दलाली
खरेदीखताला बघा
महागाई लावी लाली !
कोपतो प्रत्येक ऋतू
तशी काळी अवकाळी
पीठ मीठ भाकरीचं
शिक्षण धरी काजळी!
बनिया येती घरा तेव्हा
बटनी मतदान करा
निवडून गेले आता
शेतकरी फासाने मारा!
— विठ्ठल जाधव
संपर्क: ९४२१४४२९९५
शिरूरकासार, जि.बीड
Leave a Reply