वाटा वेड्या वाकड्या
हरवून साऱ्या गेल्या
ओल दव भिजल्या वनी
प्राजक्त फुलांत हरवल्या..
गंध मंद आल्हाद दरवळे
पावलोपावली बहर खुणा
देह भिजल्या हळव्या मनी
पर्ण ऋतूंचा मोहर नवा..
मन अलवार धुंद मोहरे
पर्ण पाचूचा हिरवा नजारा
ओल हळव्या एकांत क्षणी
रक्तीमा गाली विलसे लाजेचा..
वसंताचे आगमन होता
ऋतुराज बेधुंद बहर मना
वसंताचे हलकेच साज लेणे
सजली वसुंधरा मोहक जरा..
— स्वाती ठोंबरे.
Leave a Reply