विचारांची उठती वादळे ।
अशांत होते चित्त सदा ।।
आवर घालण्या चंचल मना ।
अपयशी झालो अनेकदां ।।
विषण्णतेच्या स्थितीमध्यें ।
नदीकांठच्या किनारीं गेलो ।।
वटवृक्षाचे छायेखाली ।
चौरस आसनावरी बसलो ।।
डोळे मिटूनी शांत बसतां ।
अवचित घटना घडली ।।
विचारांतले दुःख जाऊनी ।
आनंदी भावना येऊं लागली ।।
एक साधूजन ध्यान लावीत ।
बसत होता त्या आसनावरी ।।
पावित्र्याची वलये फिरती ।
आसन दिसले रिकामें जरी ।।
वातावरणाची ही किमया ।
अनुभवते प्रखरतेनें ।।
शुद्ध अशुद्ध विचार येती ।
सभोवतालच्या जाणिवेने ।।
डॉ. बगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply