वातावरण ते निर्मित होते, जसे जातां वागूनी
हर कृतिची वलये बनती, तरंगे ती निघूनी…१,
फिरत असती वलये तेथें, सारी अंवती भंवती
चक्रे त्याची परिणाम दाखवी, इतर जनांवरती…२,
जेव्हां कुणीतरी संत महत्मा, असे तुमच्या जवळी
चांगुलपणाचे भाव उमटती, आपोआप त्यावेळी….३,
जवळून जाता दुष्ट व्यक्ती ती, आपल्या शेजारूनी
चलबिचल ते मन होते, केवळ सानिध्यानी…..४,
याच लहरी घुसुनी शरिरी, मनी आघांत करती
मनामध्ये तो बदल करूनी, तीच वृत्ती बनविती…५,
विहीरी वरच्या दगडांनाही, खुणा पडती जेथे
कसे टिकेल तन मन तेथे, नाजूक जे असते…६
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply