आपल्याकडे ज्येष्ठ महिन्याच्या पौर्णिमेला वडाची पूजा करण्याची प्रथा आहे.
ज्येष्ठ महिन्यात वडाच्या पारंब्याना कोंब फुटायला सुरवात होते. पावसाळ्यात हे कोंब चांगले मोठे होतात. पावसाळ्यात हवेतील बदलामुळे पचन शक्ती मंदावते,अशक्तपणा असतो. त्यामुळे ह्या दिवसात काही वेळा जुलाब होतात. वडाच्या पारंब्या ह्या जुलाबाचे उत्तम औषध आहे. वडाच्या पारंब्या हाताशी असल्याने मुले,मोठेसुध्दा लोंबकाळून झोका घेतात. त्यावेळी हे कोंब नष्ट होण्याची शक्यता असते. पूजा करताना झाडाला दोरा बांधण्याची प्रथा आहे. खरे पाहता दोरा पारंब्याना बांधायला पाहीजे. म्हणजे पारंब्याच्या कोंबाचे रक्षण होईल.आणि पावसाळ्यात होणारे जुलाब थांबवायला वैद्य लोकांना मिळतील. हे त्या पूजेच्या मागचे शास्त्र आहे.
हल्लीतर शहरात वटपौर्णिमेला वडाच्या छोट्या फांद्यांचे तुकडे विकले जातात.आणि बायका घरीच वडाची पूजा करतात. ही सोय झाली.
माझी सर्व भगिनीना विनंती आहे की, तुम्ही वडाच्या फांदीची जरूर पूजा करा. पण दुसरे दिवशी ती फांदी टाकून देऊ नका. फांदीचे स्वच्छ धुऊन पाना सकट शक्य होईल तितके बारीक तुकडे करा व ते वाळवून त्याची मिक्सरमधे जमेल तशी पावडर करून ठेवा पावसाळ्यात घरातील कोणाला जुलाब झाल्यास त्या पावडरचा काढा करून द्या. ह्यामूळे जुलाब लागले की हाॅस्पिलटमधे अॅडमीट होणे, वेगवेगळ्या टेस्ट करणे, सलाईन, इंजक्शने वगैरे न लागण्याची व पैसेही वाचण्याची शक्यता आहे.
अरविंद जोशी
B.Sc.
पुणे
खूपच सुंदर माहिती ???