नवीन लेखन...

वयात येतांना

ती दहावीला होती.मीही दहावीला.
तिची शाळा वेगळी होती.
माझी शाळा वेगळी.
आमच्या घराच्या मागे असणार्‍या वैद्यकाकांच्या घरी ते कुटुंब राहायला आलं होतं.
नवरा बायको अन त्यांची एकुलती मुलगी ती.

आमच्या वर्गात मीच उंचीनं, अंगकाठीनं व वयानंही लहानच दिसायचो व होतोही.
मुली अंगभर फ्राक घालायच्या.

आम्ही मुलं हाफ पँट घालायचो.उघडे पाय,मांड्या दिसायच्या .मुलींपुढे आम्हाला कसंतरी दिवसभर व्हायचं हाफ प्प्यांटयात .
शाळा सुटली रे सुटली की लगेच फुल पँन्ट घालुनच फिरायचो.
वर्गातल्या मुलीवर मुलं फिदा..सारख्या मुलीच्या गोष्टी करणार,. सपना -वासू , मिथुन -पद्मिनी अशा नावाने.

कधी बोलायला मिळतं म्हणून वाट बघायचे.
मी उपकप्तान म्हणुन बोलायला मिळायचं.
वर्गातली ती वेगळीच होती . ती मला आवडायचीही.

पण आजची गोष्ट तीची.वर्गात नसलेली..पण ट्युशनमधली..घराजवळची.

घराजवळ राहायला आलेल्या कुटुंबातील.
बाकी दहावीच्या मुलीत ती फार थोराड वाटायची.मोठीच होती .उंच , आन वयानंही .

दुसर्‍या शाळेत जरी असली तरी वह्या , पुस्तकं मागायला पहिल्यांदा ती घरी आली ना. शेजार्‍याच्या पोरांत खळबळ माजली. तीचा धिटपणा मनातुन मला भावलाही.
गणिताच्या ट्युशनला आम्ही एकाच मास्तरकडे होतो.
झालं . सायकलंने एकत्रच जाणं सुरु झालं.

मला हिम्मत नव्हती ..

पण ती , ” चला वेळ झाला.चला क्लाँसला”
हा डाँयलाग ती बिनधास्त मोठ्याने म्हणायची .
मला मुलगा असुनही लाज वाटायची..तिच्यासोबत सोबत सायकलने जायला.
मुलगी असुन ती मला प्रत्येकवेळी सोबत यायला सांगायची.
दहादा वह्या मागायला यायची.
मुलं मला तिच्या नावानं चिडवायचे
वर्गातील ……… मला आवडायची.
पण इकडे मोहल्ल्यात हे नविनच नांव मला मिळालं.
एकदा ट्यूशनवरुन येताना माझ्या सायकलला काही टारगट पोरांनी कट मारला. मी सायकलसोबत पडलोच चांगला.

मागेअसणार्‍या तिने धावत येवुन उचललं.मला व सायकललाही.
“लहान आहे म्हणुन त्रास देता होय.. थांबा , दाखवतेच ……………………………”

असं मस्तपैकी शिव्या देत पिटाळलं. अन पुन्हा त्रास दिलात तर दाखवतेच एकेकाला..असं ठणकावून बजावलं तीने.
मला फार बरं वाटत होतं.
घरापर्यंत आणलं . माझी सायकल सांभाळत आणली तीनंच. घरातही सर्व प्रकार सांगितला.

मला मनातून कमीपणा वाटत होता. चांगलं दाखवतोच एकेकाला ..मनातल्या मनात मांडे खात लवकर मोठं होवुन सार्‍यांना चोप दिल्याचं स्वप्नही बघत होतो.
दुसर्‍या दिवशी तेच मुलं
‘बाळ, बाळ ‘ असं म्हणुन चिडवू लागली.
मार बसल्यानं मी शाळेतही गेलो नव्हतो.
तीही शाळेत जाता जाता विचारपुस करायला येवून गेली.
मी दवाखान्यात गेलो.खरचटल्यावर मलम व एक इंजक्शनही दिलं डाँक्टरनी.
जायच्या वेळेस पुन्हा डाॅक्टरला म्हटलं,”डाँक्टर साहेब एक विचारु का?
“विचार”
“मला मिशा यायला काही औषध देता का”
“अरे येतील , थोडा मोठा झाल्यावर”
“नाही सर, वर्गात खुप मुलांना आल्यात मिशा. मलाच तेवढ्या विरळ विरळ….”

” बरं, एक औषधी लिहुन देतो”म्हणुन काही लिक्विड दवाई दिली लिहुन..

मी खुश.आता बघतोच एकेकाला.
केसांचा भांग मिथुनसारखा ठेवू लागलो.
आता लवकरच मिशा येणार म्हणून मी आनंदी होतो.

दुसर्‍या दिवसापासुन मोठ्या भावाचे रंगीत मिथुनसारखे शर्ट घालुन क्लाँसला गेलो . चालणं..बोलणं बदलेलं बघुन…. मुलं बिचकलीत. तीच्यापासुनही दुरच राहत होती.

तिला माझ्यातील बदल जाणवला.

“काय रे, कसले रंगीत मवाल्यासारखे कपडे घातलेस” म्हणून हसायला लागली.
“बरं,ठिक आहे .एखादा दिवस चेंज..पण नेहमीचेच कपडे तुला छान दिसते”असं म्हणुन तिनं मला न विचारताच कामेंट दिला.
वर्गातल्या , शेंडे ,पराते,उराडे, सोनटक्के या मुलीही हसत होत्या..काय हिरो…म्हणून..
लगेच तिचं म्हणनंच ऐकायचं ठरवलं मी.

मिशाचं प्रकरण मला व डाँक्टर जाजू यांनाच माहीत होतं
मी औषध लपुन छपुन पित होतो.

महीना झाला तरी मिशा येईना.
एक दिवशी… तिने मेडीकलजवळ सायकल थांबवली.
औषध घेवून आली.

बापरे! तीच ती औषध..बिनधास्त सगळ्यांना दाखवत…
मी हळुच विचारलं,”कुणाला गं,भावासाठी का?”

“मलाच” सायकल स्टॅन्डवरुन काढता काढता ती म्हणाली

मी उडालोच.

पोरासारखी आडदांड वाटणारी ही आता मिशाही वाढवणार वाटतं.

“अगं हे मुलांचं औषध आहे”
“छे रे सगळ्यानांच चालते हे… मुरुमावर उपाय आहे हे”

मला डाँक्टरनं फसवलं तर…

“वयात येणार्‍या सर्वाना हे लागतंच…
तुही पाहीजे तर घेवू शकतो..”

“छे.. मला नको” म्हणत मी विषय बदलु लागलो..

चेहर्‍यावर मुरुम बघितलेच नव्हते ..तिच्या.

माझ्याही चेहर्‍यावर मुरुम येत होते थोडे थोडे..

वयात येत होतो…………मी!

— श्रीकांत पेटकर

Avatar
About श्रीकांत पेटकर 43 Articles
श्रीकांत बापुराव पेटकर हे कार्यकारी अभियंता पदावर कार्यरत आहेत. त्‍यांना लेखनाची आवड असून त्‍यांची 'आणि मी बौद्ध झालो' या अनुवादित पुस्‍तकासोबत कल्‍याण, शांबरीका खरोलिका, बेहोशीतच जगणं असतं,कविता मनातल्या , चांगुलपणा अवती भवती अशी एकूण आठ पुस्‍तके प्रकाशित झाली आहेत.इंद्रधनुष्य हा कथासंग्रह . पेटकर यांनी सामाजिक जाणिवेतून माहिती अधिकाराचा वापर, नागरिकांना वीज बचतीचे महत्‍त्‍व पटवून देणे, परिसरातील विधायक काम करणा-या व्‍यक्‍तींना प्रकाशात आणणे असे विविध पातळ्यांवर प्रयत्‍न केले आहेत. पेटकरांनी चित्रकलेचा छंद जोपासला असून त्‍यांच्‍या चित्रांची आतापर्यंत दोन प्रदर्शन आयोजित करण्‍यात आली आहेत.

महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..