नवीन लेखन...

वेडा अहंकार !

एक पुरातन मंदिर दिसले माझ्या दृष्टीला   ।

शिवलिंग ते सुंदर असुनी नन्दी दारी बैसला   ।।१।।

जुनी वास्तू, पडझड दिसली अवती  भवती   ।

झाडे जुडपे वाढून तेथे जागा ते अडविती   ।।२।।

किडे मुंग्या झुरूळ नि कोळी यांची वस्ती तेथे   ।

रान फुले ती उग्र वास तो दरवळीत  होते.   ।।३।।

विषण्य  झाले मन बघुनी अस्वच्छ परिसर   ।

राहील कसा ह्या वातावरणी मग तो ईश्वर   ।।४।।

पूजा नव्हती पाठ नव्हता भजन नव्हते तेथे   ।

पवित्र विधींचा अभाव असुनी दुर्लक्ष ते होते   ।।५।।

संकल्प केला त्याचक्षणी मी आपल्या मनाशी   ।

परिसर तो निर्मळ करुनी पवित्रता येई कशी   ।।६।।

घरी जाऊनी साधने आणली स्वच्छ करण्या मंदिर   ।

आखू लागलो मनी योजना शांत करुनी विचार   ।।७।।

सांज असुनी संधी प्रकश तो पडला चोहीकडे   ।

कोकिळेचा मधुर आवाज तो कानी माझ्या पडे   ।।८।।

फुलपाखरे गंध शोषित फुलावरी नाचती   ।

मध्येच जाऊन शिवलिंगावरी मध शिंपडती   ।।९।।

चिमणी आली नाचत तेथे चोंचीत घेउनी दाना   ।

शिवापुढे तो टाकला तिने उंचाउनी मना   ।।१०।।

गुंजन करीत मकरंद आला लिंगाभवती फिरे   ।

आरती कुणाची गात होता उमज ना येई बरे   ।।११।।

वाऱ्याची ती झुळक येउनी फुले तयाने उधळली   ।

अलगद येउनी मंदिरी शिवावरती पडली   ।।१२।।

चढाओढ ती दिसली मजला प्रभूच्या सेवेची   ।

लाज वाटली मनास माझ्या वेड्या अहंकाराची   ।।१३।।

 

डॉ. भगवान नागापूरकर

९००४०७९८५०

 

 

 

Avatar
About डॉ. भगवान नागापूरकर 2132 Articles
डॉ. भगवान नागापूरकर हे निवृत्त सिव्हिल सर्जन आहेत. ते ठाणे येथे वास्तव्याला आहेत. त्यांचे अनेक लेखसंग्रह आणि काव्यसंग्रह प्रसिद्ध आहेत.

1 Comment on वेडा अहंकार !

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..