केशरी क्षितिजी
त्या चंद्राची कोर
सोबत चांदणी
फिरते सभोवार
दाटलेल्या सांजवेळी
परतून येई सारी पाखरं
नसे उजेड संपूर्ण
नाही काळोख फार
सोबती निघे तो चंद्र
जिथवर जाई नजर
जणू सखा सोबती
प्रेमळ मृदू अलवार
निर्मळ नितळ मनी
उगी उठे हुरहूर
कातळास का कधी
सांग फुटेल पाझर
रेंगाळू नकोस तेथे
तू वेळी सावर
आता मनास वेड्या
तू वेळी आवर
बहकेल हे बहाण्याने
तू नको जाऊ पार
उगी काळजाशी भिडते
ही लोभस चंद्राची कोर!!
— वर्षा कदम.
Leave a Reply