रस्त्यावरती उभी राहूनी, हातवारे ती करित होती
मध्येच हसते केंव्हां रडते, चकरा मारीत बसे खालती…१,
गर्दी जमली खूप बघ्यांची, कुत्सीतपणे न्याहळू लागली,
‘शिपाई आणा जावूनी कुणी’, ठाण्यात नेण्यास सांगू लागली…२
जीवनातील दु:खी चटका, सहनशक्तीचा अंत पाहतो,
मनावरील तो ताबा सुटूनी, वेडेपणा हा दिसून येतो…३
इतकी गर्दी जमून कुणीही, तिच्या मनीचा ठाव न जाणला
रूख रुख वाटली ती बघोनी, सहानूभुती शून्य समाजाला…४
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply