नवीन लेखन...

वेडेपणातलं शहाणपण

मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरीरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणाऱ्या त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपणा होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण?


          काही  प्रश्नांना उत्तर नसत. प्रश्न विचारणाऱ्यालाही ते माहीत नसत. पण प्रश्न असा असतो की, त्याच उत्तर जरी  माहीत नसल तरी तो मनात ठसून राहतो.

परवा असाच एक प्रश्न ऐकला. प्रश्न विचारणारा माहीत नव्हाता. ज्याला विचारला तो ही माहीत नव्हता. बससाठी वाटत पाहत थांबलो होतो. शेजारी उभे असलेले दोघे इतक्या मोठमोठयाने बोलत होते की, त्यांच बोलण ऐकण्यावाचून गत्यंतरच नव्हत. बर दुसरा काही टाइमपासही नव्हता.

तावातावाने बोलणाऱ्या त्या दोघांच्या गप्पांत सर्वच विषय येऊन गेले. शेवटी, धुमकेतू गुरुवर आदळल्यावर काय होईल? या प्रश्नापर्यंत येऊन ठेवला. त्यावर चर्चा झाली  आणि अचानक त्यापैकी एकाने विचारल, ‘समजा’ मुंबई बुडाली तर काय होईल?

प्रश्न ऐकून ज्याच बोलण्याकडे लक्ष नव्हत असे आसपासचे सर्वच लोक कान टवकारुन ऐकू लागले. वादळवाऱ्यात सापडलेल्या बोटीतील प्रवासी जसे एकमेकाना खेटून उभे राहतात तसे.

          ‘कशी काय बुडणार मुंबई, ती काय बोट आहे? एकणारा वैतागून बोलला. ‘बोट नाही बेट आहे. सात बेट होती, माहिती आहे तुला.’ आणि मुंबईच्या जन्मापासून त्याने सगळा इतिहास सांगायला सुरुवात केली. द्वारका जर बुडू शकते तर मुंबई का बुडू शकणार नाही, या प्रश्नाने सगळयांच्या अंगावर शहारे आले. त्यात मुसळधार पाऊस सुरु झाला. जशी काही मुंबई बुडायला सुरुवात झाली अस वाटून, इतका वेळ शांतपणे बसची वाट बघत मोठमोठयाने चाललेल्या गप्पा असणारे आडोशाच्या शोधात नाहीसे झाले.

पावसात पूर्ण भिजल्यावर आलेल्या बसमध्ये शिरताना एकच विचार डोक्यात चालू होता. खरच मुंबई बुडाली तर? मुंबई शहर जरी बुडाल नाही. तरी अनेक नैसर्गिक आपत्ती शहरावर कोसळू शकतात, कारण त्याची रचनाच अशी झाली आहे.

एकमेकाला जोडण्यात आलेली सात बेटं, मागे हरवलेला समुद्र, बुजवलेल्या खाडया, रिक्लमेशन प्रकल्प, उंचच उंच बांधलेल्या इमारती, अवाढव्य पसलेली लोकवस्ती, पाय ठेवायला जागर उरलेली नसताना येणारी परप्रांतीय लोकांची लाट. या सगळयांचा एकत्रित परिणाम कधी तरी होणारच. लोकसंख्येच्या दबावाखालीच हे शहर बुडून गुदमरुन मरणार आहे, अस तावातावाने सांगणारा निघून गेलेला असला तरी त्याची मूर्खासारखी बडबड हलके हलके परिणाम करीत होती.

भरपावसत तासनतास उभ राहून लोकलमधून दोन अडीच तास प्रवास केल्यावर मुंबई बुडणार म्हणजे काय होणार, हे सांगायची आवश्यकता वाटत नाही.

इतकी चमत्कारिक रचना दुसऱ्या कुठल्याच शहराची नसेल. बॉम्बस्फोट, जातीय दंगली, गोदीतील बॉम्बस्फोट असले मानव निर्मित आघात सोडले तरी नैसर्गिक आपत्ती हाहाकार माजवू शकते. भोपाळची वायुगळती झाल्यावर देशातील सगळयात जास्त रासायनिक प्रकल्प असलेल्या मुंबई शहरात खबरदारीचे काय उपाय करावेत. यासाठी गांगुली समितीने पाहणी केली. ज्या वायूमुळे हजारे लोकांचे प्राण गेले तो फॉसजीन मुंबईतील अनेक कंपन्या वापरतात. अनेक घातक रसायनांचे कारखाने मुंबई शहराबरोबर असावेत म्हणून ठाणे- बेलापूर पट्टयात उभारण्यात आले. पंचवीस वर्षानंतर त्याचा कारखाना उराशी बाळगून नवी मुंबई उभी करण्याचा आणि वाढवण्याचा चमत्कारही आपल्या नगररचना तज्ञांनी दाखवला.

शंभर मैलावरुन पिण्याचे पाणी आणण्याचा विक्रम अख्ख्या जगात फक्त मुंबई शहराने केला आहे. पाणी वाहणाऱ्या नलिका या सगळयात संवेदनाक्षम ठरल्या आहेत. त्या तोंडच पाणी पळवू शकतात. तारापूरची आण्विक वीजभट्टी आहे. बीएआरसी आहे, बॉम्बे हायचा गॅस आहे, अनेक कंपन्यांच्या दृष्टीने हे सर्व एकमेकांपासून अंतराअंतरावर असायला हव. कारण या ठिकाणी काही अपघात झाला तर त्याची झळ इतरत्र बसायला नको.

मुंबई नुसती बुडून जाऊ शकते असे नाही, तर जळून भस्मसात होऊ शकते. ही सगळी चर्चा ऐकून भिजलेल्या शरिरावर काटा उभा राहिला. जगबुडी वर्तवणा-य त्या गप्पा सोडून दिल्या तरी वेडेपणातही काही शहाणपण होता. बुडणाऱ्या मुंबईला वाचवणार कोण?

-प्रकाश बाळ जोशी

आज दिनांक : २१ जुलै १९९४

प्रकाश बाळ जोशी
About प्रकाश बाळ जोशी 46 Articles
प्रकाश बाळ जोशी हे ज्येष्ठ पत्रकार आणि आंतरराष्टीय ख्यातीचे चित्रकार आहेत.
Contact: YouTube

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..