वीरांगना नीरजा भानोत यांचा जन्म ७ सप्टेंबर १९६३ रोजी चंदिगढ येथे झाला.
‘हिंदुस्थान टाइम्स’चे तेव्हाचे मुंबईतील ज्येष्ठ पत्रकार हरीश भानोत यांची ती कन्या, हीच काय ती तिची ओळख. पॅन ॲम कंपनीच्या मुंबई विभागातील नीरजा भानोत या हवाई सुंदरी होती. ५ सप्टेंबर १९८६ साली झालेल्या पॅन ॲम ७३ विमानाच्या अपहरणादरम्यान प्रवाशांना वाचविताना त्यांचे निधन झाले. ५ सप्टेंबर १९८६ रोजी कराची विमानतळावर तिच्या विमानात अतिरेकी चढले. त्यांनी पायलटना कॉकपिटमधून बाहेर काढले प्रवाशांपैकी जे अमेरिकन असतील, त्यांचे पासपोर्ट जमा करण्याची मागणी त्यांनी नीरजा यांच्या कडे केली. तिने ठामपणे नकार दिला. ही हुज्जत तब्बल १५ तास चालली. अखेर अतिरेक्यांनी बॉबस्फोट करून विमान उडवून देण्याची धमकी दिली.
नीरजाने मोठ्या शिताफीने विमानाचा दरवाजा उघडला व प्रवाशांना बाहेर काढायला सुरूवात केली. खरे तर त्या स्वत: आधीच उतरू शकल्या असत्या पण नीरजा यांनी आधी लहान मुलांना सुखरूप बाहेर काढले. त्या एका ७ वर्षांच्या मुलाला बाहेर काढत असताना संतापलेल्या अतिरेक्यांनी त्यांच्यावर बेछूट गोळीबार केला. तिच्या शरीराची चाळण झाली पण त्यांनी मुलाला वाचवले आणि ते करताना वयाच्या २३ वर्षी शहीद झाली.
हा अमेरिकन मुलगा पुढे पायलट झाला. त्याने लिहिले: माझ्या आयुष्यातील प्रत्येक मिनिट नीरजाच्या बलिदानाचे आहे. नीरजा भानोत यांनी जिवावर उदार होऊन बुद्धिचातुर्याने ४०० जणांचे जीव वाचविले म्हणून भारत सरकारने नीरजा भानोत यांना (मरणोत्तर) अशोक चक्र या भारताच्या सर्वोच्च नागरी शौर्य पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. नीरजा भानोत या भारतातील सर्वात लहान वयाची अशोक चक्र हा वीरता पदक मिळविणारी भारतीय ठरल्या.
नीरजा भानोत यांना अशोक चक्र मिळालेलीही ती सर्वात तरुण व्यक्ती होती. नीरजा भानोतच्या शौर्यगाथेवर नीरजा नावाचा हिंदी चित्रपट निघाला.
नीरजा चित्रपट.
https://www.youtube.com/watch?v=PS_T77gdMAU
— संजीव वेलणकर.
९४२२३०१७३३
पुणे.
Leave a Reply