पाठ राख घन:शामा,मी तर तुझी प्रियतमा,–||१||
साथीने तुझ्या गोकुळ सोडले,
अनया सोडून तुज वरले,
संसार सारा मोडून आले,
पोहोचले आता निजधामां,||२||
प्रीती भक्तीने झपाटले,
माझ्यात मी नच राहिले,
कृष्णा तुज सर्वस्व वाहिले, लौकिकाची केली न तमा,-||३||
अलौकिक नाते आपले,
एकरूप दोन जीव जाहले,
तनामनांचे धागे जुळले,
कृतार्थ होताना अशा संगमा,-||४||
ढगही सारे भोवती जमले, आजूबाजूस फुलली कमळे,
रंग गुलाबी त्यावर चढले,
यमुना उधाणली पाहून चंद्रमा,-||५||
मंजुळ स्वर बासरीतले,
ऐकून जीव तृप्त जाहले,
अस्तित्व माझे सारे निमाले, आठवले जेव्हा त्या समागमा,-||६||
कृष्ण कृष्ण नाम ओठातले,
नाद करत ध्वनी आत्म्यातले, इहलोकातही पुरते गुंजले,
अजरामर करत कृष्ण प्रेमा,-||७||
© हिमगौरी कर्वे
Leave a Reply