नवीन लेखन...

वेगळा भाग ११

प्रेम हि एक अशी गोष्ट आहे ती कधी कुणालाहि कुणाबद्दलहि वाटू शकते , प्रेमाला रंग -रूप कळत नाही कि जात-पात कळत नाही कि गरीब- श्रीमंत हि कळत नाही , त्या  दोघांमध्ये  नेहमी एक अखंड प्रेम करत असतो आणि दुसरा त्याला  प्रतिसाद देत असतो , काही दिवसापूर्वी  बाबूला एक न आवडणारी व्यक्ती ,तिच्या कडे बघावस हि त्याला वाटायचं नाही , आणि काही दिवसा नंतर मात्र जे काही घडल त्या नंतर त्याला आधी तिच्या बद्दल काळजी , सहानभूती आणि नंतर प्रेम असा त्याचा प्रवास सुरु झाला , बायडा नेहमी आनंदी दिसली पाहिजे हे जणू त्याच धैर्य बनून बसल आयुष्याच  , घरात त्याच आधीही फारस आई सोडली कि कुणाशी पटायचं नाही , आणि आता तर त्याला त्याच्या आई इतकीच महत्वाची बायडा वाटू लागली होती , तो नेहमी तिला काही न काही वस्तू भेट म्हणून देत असे , एकदा असच त्याला तिला पत्र लिहावस वाटल त्याने ने लिहील देखील आणि कामावर जाताना तिच्या हातात देऊन तो हसतच पसार झाला,

दुसर्या दिवशी बायडा ने त्याला अडवलं , “ ह्या कागदच काय करू “,

काय करू म्हणजे , त्यात काहीतरी लिहिलंय मी , वाच न ते “

“ पर मला न्हाय वाचता येत, कामावरल्या बाईसाहेब आहेत त्याच्या कडून वाचून घेईल , “

वेडी बिडी ,झालीस का तू , आण इकड ते पत्र ,” त्याने ते पत्र घेऊन रागाने ते फाडून टाकल, आणि निघून गेला कामावर,

कामावर गेल्यावर मात्र  त्याला त्याच्या वागण्याच वाईट वाटल , तो लौकरच कामावरून निघाला , बायडा जिथे काम करते तिकडे तो गेला , बायडा एका बंगल्यामध्ये साफसफाई च काम करायची, तो त्या बंगल्याच्या गेट जवळ उभा राहिला , ती दिसतेय का ते पाहू लागला खूप वेळ काही ती त्याला दिसली नाही त्याने पूर्ण बंगल्याला वळसा घाल्यासाठी उजव्या बाजूने सुरुवात केली अर्धा बंगला पार केल्यावर त्याला बंगल्याच्या आत असेलली छोटी बाग लागली त्या बागे मध्येच बायडा झाडांना पाणी देत उभी होती , ती दिसताच तो तिच्या जवळ गेला , बंगल्याच्या त्या बाजूच्या भिंतीला बाहेरच्या बाजूने एक कट्टा होता त्या कट्ट्यावर उभा राहून त्याने तिला आवाज द्यायला सुरुवात केली , त्याला पाहतच ती धावतच त्याच्या जवळ गेली तिला त्याच्या कडे मान वरून करून जास्त वेळ बोलता येईना डोळ्यावर सूर्याची प्रखर किरण येत होती, तिने बंगल्याच्या आता जाऊन एक छोटा लाकडाचा स्टूल आणला ,

“ हिकड काय तुझ, मी इथ काम करती ना , हिकड कशाला आलास तू”

“माफ कर मला , मी सकाळी अस ते पत्र फाडायला नको होत”

“ठीक हाय, आता जा तू इथून”

“तू रागावली नाहीस ना माझ्यावर”

“ अर न्हाय र बाबा , तू आधी जा हिकडून”

“बर मी जातो तू मला संध्याकाळी दत्त मंदिरात भेट , मी वाट बघेल तुझी”

“दत्तू “

“दत्तू काय म्हणतेस , दत्त महाराज बोल ना “

“ अर दत्तू, माझा भाव येतोय हिकड ते बघ, थांब थांब तू बघू नगस तू आधी पळ हिकडून “

बाबू ला काही सुचल नाही बाबू ज्या दिशेला जाणार त्या डाव्या बाजूनेच दत्तू येत होता , त्याने तशींच खाली उडी मारली आणि त्याच कट्ट्या खाली झोपून स्वत: ला त्याने लपवलं.

दत्तू बायडाचा लहान भाऊ होता.

“काय र , दत्तू काय झाल “

“ मला आठ आण दि   “ दत्तू ने नाक पुसत तिला पैसे मागितलं.

“ आठ आण आर सकाळीच मी तुला रुपया दिलता ना बाळा”

“चोराला तो दादान मी अंघोळीला गेल्तो तवा”

“चोराला , ह्या पश्या च्या तर मी , तुला बी नीट ठेवता येत न्हाय का पैस, माझ्याकड काय पैशाच झाड हाय”

“तू देणार हायीस का नाय ,”

“ न्हाईत आता मझ्याकड , जा बर हिकडंण”

“बर ह्या बाब्याला मागतो पैस, भाईर ये र , आठ आण हाईत का तुझ्याकड “ दत्तू ने खाली वाकून बाबू ला विचारल.

बाबू बाहेर आला , त्याने गुपचूप खिशात हात घालून दत्तूला आठ आणे दिले ,

दत्तू उड्या मारत पैसे घेऊन निघून गेला.

बायडा बाबूच्या मळलेल्या कपड्यांकडे बघून हसायला लागली, बाबू पण थोडासा रागावला आणि मग तो हि हसू लागला .

आणि बायडा ला तिच्या मालकीनेने आत बोलावले ,

“चल , जाते मी ,  तुझ पत्र कस वाचू म्या , मला लिहायला आणि वाचंयला कुठ यतय” अस म्हणून ती आता निघून गेली,

बाबूला वाटल किती  मूर्ख आहोत आपण इतकी साधी गोष्ट आपल्याला का कळली नाही , त्याने ,मनाशी काही तरी ठरवलं आणि तो तिथून निघाला

घरी आल्यावर तो झेंडु ची म्हणजे त्याच्या लहान बहिणीची पाटी पुस्तक शोधू लागला ,

आई ने ते नक्कीच जपून ठेवले असणार हे त्याला माहित होते , काहीवेळ शोधाशोध केल्यावर त्याला एकदाच्या त्या वस्तू सापडल्या , त्याने लगेच एका पिशवीत भरून घराबाहेर एका आडोश्याला लपून ठेवल्या.

संध्याकाळी घरी जाताना बायडला त्याने गाठल आणि म्हणाला चल माझ्या सोबत , बायडा ला काही बोलायची उसंत न देता ते दोघे धावतच टेकडीवर गेले , एका ठिकाणी चांगली जागा शोधली आणि बसले.

पळून पळून दोघांना धाप लागली होती , बायडा ला वाटल कि बाबू ने आपल्याला त्या तश्या वेगळ्या कारणासाठी इथे आणलंय पण बाबूने लगेचच जवळच्या पिशवीतून पाटी, पेन्सील आणि  अंक लिपी च पुस्तक काढल.

“हे आणकीन कश्याला “ बायडा चा हिरमोड झाला ती वैतागून बाबू कडे पाहू लागली.

“ हे बघ तुला माझी पत्र वाचता येत नाहीत ना म्हणून हे सगळ, चल हे बघ ह्याला म्हणतात अ , अ अ आई चा अस म्हणून त्याने पाटीवर अ काढून , आणि बायडाचा हात धरून गिरवू लागला , बायाडला त्याच्या स्पर्शाने मोहरल्या सारख होत होत , ती गालातल्या गालात हसत होती पण बाबूच्या डोक्यात निदान त्यावेळी तरी  वेगळ काहीही न्हवत तो मन लाऊन तिला लिहायला शिकवत होता.

आणि दूर कुठे तरी कोणी तरी त्याच्या कडे एकटक पाहत  आणि पाहणारी व्यक्ती दुसरे तिसरे कोणीही नसून बाबू चे वडीलच होते.

क्रमश:

— निशा राकेश गायकवाड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..