नवीन लेखन...

वेगळा भाग – १२

बायडाला आणि बाबुला एकत्र पहिल्या नंतर त्या रात्री जेव्हा दादा  घरी आले तेव्हा त्यांनी आल्या आल्या बाबू ची चौकशी सुरु केली ,

त्यांना तो त्याच्या नेहमीच्या ठिकाणी झोपायला गेला हे समजल्यावर ते तसेच उठून त्याच्या कडे गेले .

बाबू ला झोप लागतच होती कि त्यांना शेजारी कोणीतरी येऊन बसलय अशी चाहूल लागली आणि सोबत दारू चा वास देखील  आला.

“ झोपलास व्हय र “ दादांनी त्याच पांघरून उघडून विचारल .

दादांचा आवाज कानावर पडताच तो उठून बसला , त्याला काही समजेना ह्यावेळी दादा आणि इथ ,

“ काय झाल दादा  काही काम होत का माझ्या कडे”

“ संध्याकाळ च्या वक्ताला त्या आबाच्या पोरीला घेऊन टेकडावर का  गेल्तास “

बाबू चे डोळे क्षणार्धात मोठे झाले त्याला काय बोलाव हे सुचेना ,तो नुसताच बसून राहिला खाली मान घालून काही न बोलता

“ आर , बोल कि मी पाहयल तुम्हा दोघाना टेकडावर जाताना आणि काय करत व्हतात ते बी पाहयल”

“दादा , तुम्ही समजता तसं काही नाहीये , मी तिला लिहायला , वाचायला शिकवीत होतो ,” बाबु आपली बाजू सांगू लागला.

“व्हय का , आर बाब्या ह्ये क्यास उन्हान न्ह्याय पांढर झाल” अस बोलून दादा उपरोधिक पणे हसू लागले .

बाबू ला त्याच ते तसं हसन आवडलं नाही,  त्याला त्यांच्या दारू चा वास देखील  सहन होत न्हवता , पण तरीही तो मुकाट्याने सर्व ऐकत होता,

“ बाप म्हणून एकच सांगतो तुला बाब्या , हे काय प्रेमात बिमात पडला अशील ना तर ते  डोक्यातून काढून टाक , कारण उद्या जर लगीन करायचं ठरवलस ना , तर तो आबा न्हाय तयार व्हायचा , आन मग नंतर पस्तावण्या परीस येळीच ह्यातून भाईर पड, नाद सोडून दे त्या पोरीचा , तुला तिच्या संग आविश्य काढाय न्हाय मिळायचं”

बाबू ला ह्यावर काय बोलाव हे सुचेना हे नेमक दारूच्या नशेत बोलतायेत कि …… , तो फक्त त्याच्या कडे एकटक पाहत होता ,

बाबू कडून काहीच प्रतिसाद नाही आणि पुढे अजून काय बोलाव हे न  सुचल्या मुळे दादा उठले आणि तोल सावरत त्यांनी घरची वाट धरली.

सकाळी उठल्यावर  बाबू ची सगळी तयारी झाली कामावर जाण्या आधी तो चहा पिण्यासाठी आई जवळ बसला , आई स्टोव्ह वर चपात्या करीत होती , तिच्याशी बोलण्या आधी त्याने एक नजर पलंगावर टाकली , दादा मंद लयीत घोरत होते.

“आई , तुला एक विचारु “

“आरे , हे काय मध्येच कामावर जाताना”

“तू दादांशी लग्न काय म्हणून केलस”

“ बाबू , “ आई आश्चर्य आणि राग एकाचवेळी व्यक्त करत म्हणाली.

“ तू मला एकदा सांगितलं होतस ना कि मी सातवी पर्यंत शिकले आणि आपले दादा फक्त दुसरी ते पण त्यांच्या वडिलांनी जबरदस्ती ने मारून मुटकून पाठवलं म्हणून त्यांना जेमतेम लिहायला आणि वाचायला येतंय , मग तू अश्या कमी शिकलेल्या माणसाशी लग्न करायला तयार का झालीस , ”

“ तुला का हे आता ऐकायचंय “

“काल , मी आणि बायडा टेकडीवर गेलो होतो , मी तिला लिहायला , वाचायला शिकवतोय सध्या , आणि हे दादांनी आम्हाला पाहिलं , दादा मला म्हणाले कि आबा तुमच लग्न होऊ द्यायचा नाही , मला काही कळेना , म्हणजे बायडा शिकलेली नाही म्हणून जर तिचे वडील आमच्या लग्नाला आडवे येतील का?, मग तसं असेल तर तुमच लग्न तर झालच कि ”

“काय करू बाबू तुझ मी, दादाचं आणि माझ लग्न झाल ते ह्यासाठी, कारण दादा चांगले नोकरी धंद्याला होते, आल स्थळ आणि मुळात आपल्यातला मुलगा होता  मग उरकून टाकल लग्न माझ , आणि आमच्या वडिलांपुढे कोण काय बोलणार तुला तर माहितच आहे, आणि तसही बाबू , तू आता फक्त पंधरा वर्षाचा आहेस , खूप लहान आहेस तू ,, कोणी भरवलं तुझ्या डोक्यात हे लग्न वैगेरे”

बाबुला काही कळेना , तो आईला सर्व सांगून बसला होता ,

“कोणी नाही , चल निघतो मी उशीर झालाय मला , “

“थांब जरा , ते रात्र शाळेची चौकशी करणार होतास केलीस का , कि हे सुतारकाम आहे चांगल आयुष्यभर”

“हो केली होती मी चौकशी , आता अभ्यास खूप शिकवून झालाय म्हणे, पुढच्या वर्षी दाखल व्हा म्हणाले“

“हो का , मग निदान पुस्तक आण , वाचायला ह्या वर्षी सुरुवात तरी करशील, आणि ते बायडा च……” पुढे काही आई बोलणार तेवढ्यात बाबूच तिला “ आई , अग निदान तू तरी नको ग काही बोलूस ,” अस म्हणून कामावर निघून गेला

जवळ जवळ सहा सात माहिने ह्यात निघून गेले , आठवड्यातून ते दोघ तीन चार वेळा टेकडीवर भेटायचे , बायडा  आता बर्याच प्रमाणात वाचू आणि लिहू लागली होती , पत्र वाचायच्या निम्मिताने का होईना बाबू ने तिला साक्षर केल होत .

तिला तो सतत वाचनासाठी प्रोत्साहन देत असे स्वतः जवळ ची पुस्तके आणून देऊन तिला ती मोठ्याने त्याच्या समोर वाचायला सांगी.

ह्या दोन प्रेमी युगुलांच भेटण हे जगा वेगळ होत , त्यात ते दोघ काही एकमेकांना मिठ्या मारत न्हवते, कि काहीतरी उगीच गप्पा मारीत न्हवते.

अशोक ला मात्र हा सगळा बावळट पणा वाटे , त्याला वाटे हा बाबू काय डोक्यावर पडलाय का, असा काय हा, तो सदैव बाबुला प्रेमाचे धडे देई, कित्तेकदा त्याला सिनेमाची तिकिटे स्वतःच काढून आणून देई , पण बाबू मात्र नको रे बर नाही दिसणार म्हणून पुन्हा त्याच्याच खिशात कोम्बी. एकदा तर अशोक ने त्याच्याशी खूपच हुज्जत घातली ,अरे बाब्या , तुला नसेल वाटत काहीच तू तर लहानपणा पासून संतच आहेस, पण तीच काय तिला नसेल का वाटत , हव तर विचार तिला , पण बाबू त्याच्या मतावर ठाम होता , ते दोघ संध्याकाळी पुन्हा भेटले.

बायडा बाबू ने आणून दिलेल्या पुस्तकतील उतारा मोठ्ठ्याने वाचीत होती ,मध्ये मध्ये अडखळत होती , पण बाबू च तिच्या वाचनाकडे लक्ष न्हवत तो दूर कुठे तरी एकटक सूर्यास्त पाहत होता , आणि  त्यावरून परतीच्या वाटेवर जाणारा पक्षांचा थवा , आज पास ची झाड वार्यावर डुलत होती जणू त्या पाखरांना  मूक निरोप देत होती, उद्या पुन्हा या आम्ही सर्व तुमची वाट पाहतोय अस सांगत होती , बायडा चा स्पर्श त्याची खांद्याला झाला आणि तो भानावर आला ती देखील पुस्तक बाजूला ठेऊन त्याच्या सोबत सूर्यास्त पाहू लागली ,

“बायडे , तुला एक विचारू, खर खर सांगशील मला “

“इचार कि ,”

“तुला मी खरच आवडतो का ग “

बायडा नुसतीच हसली , आणि पुन्हा उगीच सोबतच पुस्तक चाळू लागली.

“सांग ना , तू गप्प का , आणि कधी तरी घडाघडा बोलत जा , बोल्या शिवाय समोरच्या कस कळेल तुझ्या मनात नेमक काय चालू आहे ते “

“काय बोलू ,तू इतका शिकलेला हाईस, तुझ्या म्होर काय बोलाव हेच मला कळत न्हाई, म्हणून मंग मी फकस्त ऐकत बसती तुझ बोलन , मला लयी आवडत तू जे काय माया संग बोल्तूस, तू जे मला शिकीव्तोस, ते समंद मला लयआवडत , “ ती बाबू कडे न पाहताच सर्व काही बोलत होती, आणि अचानक जेव्हा तिने त्याच्या कडे पाहिलं तेव्हा तो एकटक तिच्या कडे पाहत होता ,”

बायडा अचानक गप्प झाली , तिला काय बोलाव हे सुचेना ,

“अजून , गप्प का झालीस , बोल ना, आज फक्त तू बोलायचं आणि मी ऐकणार “

“मी काय बोलू, झाल माझ बोलून”

“अशोक म्हणतो , तू बायाडाला सिनेमाला का घेऊन जात नाही, आपण जायचं का एकदा “

“शिनेमाला , चाललं कि , मी कधीच गेली न्ह्याय थेटरात “

“हो का , ठीक आहे परवा लौकर निघ कामावरून , आणि दुपारी तीन वाजता स्टेशन जवळच्या गुंजन जवळ येऊन थांब”

बायडा प्रचंड खुश झाली , आयुष्यात पहिल्यांदा ती थेटर मध्ये जाऊन सिनेमा पाहणार होती , तिच्या प्रत्येक हालचाली वरून ती खूप उत्साही वाटत होती , आणि बाबू तिच्या कडे नुसता पाहत होता , तीच ते लहान मुला प्रमाणे हसण, फुलपाखरासारख बागडण त्याला खूप आवडत होत , टेकडी संपून वस्ती कधी  सुरु झाली दोघांना देखील कळली नाही . त्यांनी हसत हसतच एकमेकांचा निरोप घेतला .

बायडाचा निरोप घेऊन घरी पोहोचताच , त्याला त्याच्याच घरातून जोर जोरात ओरडण्याचे आवाज यायला लागले .

क्रमशः

— निशा राकेश गायकवाड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे ‘ढोल’ नृत्य

गडचिरोली जिल्ह्यातील आदिवासींचे

राज्यातील गडचिरोली जिल्ह्यात आदिवासी लोकांचे 'ढोल' हे आवडीचे नृत्य आहे ...

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर जिल्ह्यातील कर्जत

अहमदनगर शहरापासून ते ७५ किलोमीटरवर वसलेले असून रेहकुरी हे काळविटांसाठी ...

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

विदर्भ जिल्हयातील मुख्यालय अकोला

अकोला या शहरात मोठी धान्य बाजारपेठ असून, अनेक ऑईल मिल ...

अहमदपूर – लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर - लातूर जिल्ह्यातील महत्त्वाचे शहर

अहमदपूर हे लातूर जिल्ह्यातील एक महत्त्वाचे शहर आहे. येथून जवळच ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..