नवीन लेखन...

वेगळा (कथा) भाग ६

अनिल बाहेर येताच इतक्या वेळ बडबड करत असलेल्या अशोक ची तंतरते, त्याला पुढे काही बोलायचं सुचतच नाही तो नुसता अनिल आणि बायडा कडे आळीपाळीने बघत राहतो.

“अरे ये गयबान्या, काय बोल्ला तू , बाबूच काय “अनिल आता जवळ जवळ अशोक च्या अंगावर येऊ लागतो.

“काय बाबू च , बाबूच काय नाय, कोण बोल्ल बाबू,  तो तर , तो तर झोपलाय तिकडे” अशोक ने कसबस त्याच वाक्य’ पूर केल.

त्या सर्व आवाजाने मागच्या अंगणात झोपलेले बायडा चे वडील आबा त्यांना जाग येते, ते डोळे चोळत बाहेर येतात.

“काय कालवा चालाय , काय ग बायडे कोण हे धोग “ आबांनी तिला विचारतात.

बायडाला काय बोलाव हे सुचत नाही  , पण आबांच्या येण्याने मात्र अशोक ला सुटकेचा मार्ग सापडतो.

त्याने लगेच आबांना “आहो , हा अनिल तुमच्या घरात घुसला होता , आणि तुम्ही तिकडे झोप काढा  मस्त , कळत की नाही तुम्हाला काही “

“बायडे , काय ऐकतोय मी , हे खर हाय का “ आबांची झोप आता पार उडाली होती.

“अहो तिला काय विचारताय, मी माझ्या स्वत: च्या डोळ्यांनी बघितलं , हा आत घुसला होता आणि मग मी ह्यांना बाहेर बोलावलं” अशोक ने सांगून टाकल.

अनिल मात्र अशोक कडे खाऊ का गिळू ह्या नजरेने बघू लागला.

“तुझ्या तर आता “, अस म्हणून, आबांनी मागचा पुढचा विचार न करता बायडाला त्यांच्या जवळच्या काठीने मारायला सुरुवात केली.

“आई विना पोर, कस वाढवली माझ मला माहित , कामावर जातीस म्हणून तुझ हे धंद खपवून घाययचं वा मी , समजतीस कोण सवताला,

पोराला घरात चोरून भेटती , लगीन करून देऊ व्हय तुझ , घाई झाली न्हव लय , तुला आता जीत्तच सोडत नसतो मी, अब्रू येशी वर टांगाय निघालीस, चांडाळणी”

बायडा शांतपणे आबांचा मार खात उभी होती , ती जरा देखील काठी चुकवीत न्हवती, कि रडत न्हवती .

ह्या सर्व कोलाहलात अख्खी वस्ती जागी झाली, संपूर्ण वस्तीला एका मिनिटात घडलेली सर्व हकीकत समजली, त्यातल्या  काही जणांनी आबाला अडवलं त्याच्या हातातली काठी लांब कुठे तरी फेकून दिली,

आबा शेवटी ओरडून बडबड करून थकले आणि ते लहानमुला प्रमाणे केविलवाणे रडू लागले. तोवर अनिल मागच्या माग पळून गेला , पण अशोक मात्र भीतीने थरथरत तिकडेच उभा राहिला , त्याला आता काय कराव हे अजिबात सुचत न्हवत , पाळूनही जाता येत न्हवत.

काही बायका बायडाला घरात घेऊन गेल्या , तिच्या पाठीवर चांगलेच वळ उठले होते.

आणि लांब कुठे तरी आबांची ती फेकलेली काठी हातात पडकून बाबू सुन्न नजरेने सर्व पाहत उभा होता .

रात्र संपली.

आयुष्यात काहीही झाल , कितीही वादळ आली तरी मनुष्य जन्माला जगन काही सुटत नाही , रात्री इतका तमाशा होऊन देखील वस्ती मात्र काहीच घडल नाही ,

अश्या अविर्भावात तिचे सर्व दिनक्रम उरकत होती. तोच तो कालवा, पाण्यासाठी भांडण, तेच सर्व वातावरण.

बाबूला मात्र रात्री खूप उशिरा केव्हा तरी झोप लागली,  अशोक मात्र परस्पर घरी निघून गेला होता .

बाबू नेहमी प्रमाणे अंगावर पांघरून घेऊन झोपला होता , आज आईने त्याला खुप हाकां मारल्या तरीही तो काही उठला नाही आणि चंदू काही केल्या त्याला उठवायला जायला तयार होईना ,बाबू ने शाळेला आज दांडी मारली.

बाबू ने अख्खा दिवस बसून घालवला , त्याच मन कुठेच लागेना , अशोक देखील सबंध दिवस त्याला भेटला नाही.

संध्याकाळी दत्त मंदिरात जाऊन काही वेळ तो बसला , पण तिथे देखील त्याच मन लागत न्हवत , शेवटी घरी येताना त्याला बायडाच्या घरी डोकवाव अस वाटल , तो तिच्या घराच्या दिशेने काही अंतर ठेऊन काही दिसतंय का ते पाहू लागला ,

“वाकडला गेली, मावशी कड,” अस म्हणून अशोक ने त्याच्या खांद्यावर हात ठेवला.

बाबू तसाच सुन्न नजरेने त्याच्या कडे बघत होता ,

“का गेली “ बाबू ने कसबस अशोक ला विचारल .

“कालचा तमाशा , तू पाहिलास कि झोपला होतास,” अशोकने त्याच्या डोळ्यात पाहत विचारल.

“पहिल मी सगळ , पण त्यात तिची काय चूक , मी त्या अनिल ला ओळखतो , तोच आला असेल जबरदस्ती तिच्या घरात”  बाबू चा चेहरा पार पडला होता.

“अनिल ला ओळखतोस तू, आणि बायडा , तीच काय , तिला नाही ओळखत तू , काल जेव्हा तिचा बाप तिला मारत होता, तेव्हा तुला जराही काही वाटल नाही,

रक्त नाही उसळल तुझ , गप्प बसलास तू बाबू , अरे प्रेम करतोस ना तिच्यावर” अशोक बाबू ला कमालीचा झापत होता .

“प्रेम , अरे नाही रे बाबा , माझ नाहीये काही प्रेम वैगेरे , “ बाबू काकुळतीला येऊन बोलू लागला .

“अच्छा, मग त्या दिवशी, इतक खोदुन खोदून कोण विचारत होत , बायडी बद्द्दल” अशोक आता काही थांबणार न्हवता.

“ अरे मी ते सहज , मला तर तिचा खूप राग यायचा , मला तर ती घरात आलेली पण चालायची नाही.” बाबू अशोक ला जमेल तितक आणि जमेल तसं समजावत होता .

“नाही न चालायची, मग का इतक्या चौकश्या करत होतास , लक्षात येतंय काही साधारण “अशोक बाबू च्या डोक्याला हात लावून म्हणाला.

“काय , बोलतोयस मला काही कळत नाहीये ,” बाबू आता हतबल झाला होता.

“ अरे , मुर्खा ह्यालाच तर प्रेम म्हणतात,  तुला ती आवडायची नाही , तरीही तूला त्या दिवशी तिच्या घरी काय घडलं हे जाणून घाययचं होत, काय गरज होती.”

“ माणुसकी म्हणून नसू शकते का गरज “

“हो का, आणि आज शाळेत आला नाहीस, हा तुझा पडलेला चेहरा, तिच्या घरात हे अस डोकावून बघण, ही सुद्धा तुझी माणुसकी आहे का?”

“होय ,  असू शकते ना, जरुरी आहे प्रेमच असेल”

“मूर्ख आहेस तू बाबू, काय पण मित्र पाळलाय मी “अस म्हणून अशोक तावातावाने बाबू समोरून निघून गेला .

रात्री झोपायच्या वेळी आकाशात चांदण्या मोजत बाबू, अशोकच्या बोलण्याचाच विचार करत होता,  डोळ्यावर झोप यायला लागली तशी ,

आकाशातल्या चांदण्यांची जागा आता बायडी च्या चेहऱ्याने घेतली, तोच शांत डोळे मिटून मार खात असेलेला तिचा चेहरा .मध्येच त्या चेहऱ्याने डोळे

उघडले आणि तो चेहरा बाबू कडे पाहत रडू लागला. बाबू ने खाडकन डोळे उघडले आणि मनाशी काहीतरी ठरवून तो पुन्हा झोपी गेला .

सकाळी जरा फटफटल तेव्हाच उठून बसला , आणि तयारी करून वेळे आधीच शाळेत निघाला , आई त्याच्या’ कडे शांतपणे पाहत होती ,

“बाबू  , आज इतक्या लवकर निघालास शाळेत” आईने विचारल.

हो आई , जरा देवळात जाऊन मग जाईल म्हणतो,” बाबू ने उत्तर दिल.

रस्त्यात त्यांच्या नेहमीच्या ठिकाणी त्याला अशोक  भेटला , बाबू ने रात्री काय ठरवलं हे त्याला सांगितलं.

अशोक बाबू कडे पाहतच राहिला,

“म्हणजे बाब्या, तू खरंच , तू खर बोलतोयस ना” अशोक ला अतिशय आनंद झाला होता.

“होय ,अशोक पण मला अजूनही शंका येतेय” बाबू ने त्याची चलबिचल अशोक ला सांगितली.

“काही शंका नको घेउस, हा बाबा अशोक जे बोलतो ते तो उगीच नाही अनुभवातून बोलत असतो, माझा आशीवार्द आहे वत्सा तुला, जा विजयी भव”

बाबू आणि अशोक दोघे हसायला लागले.

बाबू अशोक चा निरोप घेऊन  एस्टीस्टँड दिशेने चालू लागतो .

एस्टी मध्ये चढून “ एक वाकड द्या” अस म्हणून दिलेलं  तिकीट खिशात टाकून पुढच्या प्रवासाला निघतो .

क्रमश:

— निशा राकेश गायकवाड.

Be the first to comment

Leave a Reply

Your email address will not be published.


*


महासिटीज…..ओळख महाराष्ट्राची

रायगडमधली कलिंगडं

महाराष्ट्रात आणि विशेषतः कोकणामध्ये भात पिकाच्या कापणीनंतर जेथे हमखास पाण्याची ...

मलंगगड

ठाणे जिल्ह्यात कल्याण पासून 16 किलोमीटर अंतरावर असणारा श्री मलंग ...

टिटवाळ्याचा महागणपती

मुंबईतील सिद्धिविनायक अप्पा महाराष्ट्रातील अष्टविनायकांप्रमाणेच ठाणे जिल्ह्यातील येथील महागणपती ची ...

येऊर

मुंबई-ठाण्यासारख्या मोठ्या शहरालगत बोरीवली सेम एवढे मोठे जंगल हे जगातील ...

Loading…

error: या साईटवरील लेख कॉपी-पेस्ट करता येत नाहीत..