रंग भरले जीवनीं, रंगात चालतो खेळ
टप्प्या टप्प्याच्या नादानें, जाई निघूनीया काळ….१,
शिखरावरचे ध्येय, दुरुनी वाटते गोड
लांब लांब वाट दिसे, जाणें तेथे अवघड……२,
ठरलेल्या वेळेमध्ये, जातां योग्य दिशेनें
यश पदरीं येईल, निश्चींच रहा मनानें….३,
रमती गमती कुणी, टप्प्यांत रंगूनी जाती
वेळ सारा दवडूनी, निराशा पदरी येती…४,
जीवनातील अंगाचे, अनूभव घेत जावे
मिळणाऱ्या त्या सुखाला, क्षणीक असे समजावे…५,
रूकू नका एके जागीं, चालणें जीवन होय
प्रभूमय होता येणे, हेच असावे ध्येय….६
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply