मूल्य नाही कुणा, तूं दिल्या वेळेचे
गमावून टाकी, जाणूनी फुकाचे….१,
लागत नसते, दाम वेळेसाठीं
म्हणून दवडे अकारणा पोटीं….२,
वस्तूचे मूल्य ते, पैशांनीच ठरते
समज सर्वांची, अशीच असते…३,
वेडे अहा सारे, कसे होई मूल्य
वेळ जातां मग, आयुष्य जाईल…४,
वेळ दवडतां, कांहीं न राहते
सर्वच जीवन, व्यर्थ तें ठरते….५
— डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
Leave a Reply