हपालेल्या निष्ठूर काळा,
समाधानी तू कसा होशील,
बळी घेण्याचे सत्र तुझे ते,
केंव्हां बरे तू थांबवशील ? ।।१।।
नित्य तुला भक्ष्य लागते,
वेध घेई टिपूनी त्याचा,
मिस्कीलतेने हासत जातो,
गर्व होई स्वकृत्याचा ।।२।।
अवचित कशी ही भूक वाढली,
मात करूनी त्या वेळेवरी,
सूडानें पेटूनी जावूनी,
बळी घेतले गरीबांचे परी ।।३।।
काळ येई परि वेळ न आली,
म्हणून सदा हताश होतो,
वेळेची ढिलाई बघूनी,
तांडव नृत्य करीतो ।।४।।
शांत होऊ दे क्रोध तुझा ,
बळी कुणाचा राग कुणावरी,
‘वेळवरती’ अवलंबूनी तूं,
जाण ठेव याची तरी ।।५।।
डॉ. भगवान नागापूरकर
संपर्क – ९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply