वेळ येता उकलन होते, साऱ्या प्रश्नांची
जाणून घ्या हो थोडे तुम्ही, रीत निसर्गाची…१,
जेंव्हां तुम्हाला यश ना मिळते, एखाद्या प्रश्नी,
वेळ नसे योग्य आली, हेच घ्यावे जाणूनी…२,
प्रयत्न सारे चालूं ठेवतां, यश ना मिळे
कांहीं काळासाठी थांबवा, प्रयत्न सगळे…३,
काळ लोटतां प्रयत्न होती, पुनरपि सारे,
उकलन होवून गुंत्यांची, आख्खे निघती दोरे…४,
कुणी म्हणती ग्रह अनूकुल, ह्या घटनेला
हीच वेळेची किमयासारी, कशी कळे कुणाला….५
डॉ. भगवान नागापूरकर
९००४०७९८५०
bknagapurkar@gmail.com
Leave a Reply